Breaking

मंगळवार, २१ डिसेंबर, २०२१

जिद्द व चिकाटीच्या जोरावर सामान्य विद्यार्थी ही स्पर्धा परीक्षेत यशस्वी होऊ शकतो : प्रा.डॉ.अमर कांबळे

 

प्रमुख वक्ते प्रा.डॉ. अमर कांबळे


प्रा.अक्षय माने : कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी


रूकडी :  सामान्य कुटुंबातील व सामान्य बुध्दीमत्तेचे विद्यार्थी सातत्यपूर्ण प्रयत्न व चिकाटी यांच्या बळावर  स्पर्धा परीक्षेत यशस्वी होऊ शकतात. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत यशस्वी होऊन अधिकारी म्हणून काम करीत आहेत, त्यातील बरेचजण गरीब कुटुंबातील आहेत आपण फक्त्त  यशस्वी होण्याची जिद्द बाळगून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला पाहिजे तुम्हाला यश  निश्चित प्राप्त होते असे मत नालंदा प्रशासकीय सेवा अकादमी इचलकरंजीचे अध्यक्ष डॉ. अमर कांबळे यांनी व्यक्त्त केले ते येथील राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालयात करियर कौन्सिलिंग अँड प्लेसमेंट सेलच्या वतीने आयोजित केलेल्या स्पर्धा परीक्षा या विषयावरील व्याख्यानात बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांतकुमार कांबळे होते. 

      स्वागत व प्रास्ताविक डाॕ. विजय देसाई यांनी केले या व्याख्यानात डॉ. अमर कांबळे यांनी दहावी-बारावीनंतर तसेच पदवीनंतर एमपीएससी व यूपीएससी च्या वतीने घेतल्या जाणाऱ्या विविध  स्पर्धा परीक्षेची माहिती दिली. 

           अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. प्रशांतकुमार कांबळे म्हणाले  बारावी नंतर केवळ पदवी मिळविण्यासाठी शिक्षण घेवू नका तर पदवीचे शिक्षण घेत असताना स्पर्धा परीक्षेचाही अभ्यास करा पदवी नंतर तुम्हाला या अभ्यासाचा उपयोग होईल व स्पर्धा परीक्षेत यशस्वी व्हाल. 

   आभार बी.ए. भाग २ मधील विद्यार्थीनी कु. ऋतुजा जाधव हिने मानले तर सूत्रसंचालन बी.काॕम.भाग तीन मधील विद्यार्थीनी कु. सकीना नदाफ हिने केले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा