जयसिंगपुरात धम्मपरिषद आरोग्य राज्यमंत्री मा.राजेंद्र पाटील-यड्रावकर |
जीवन आवळे : विशेष प्रतिनिधी
जयसिंगपूर ही समर्पित ज्ञानाची भूमी आहे. येथे धम्माचे सुपीक येण्यासाठी माणसं लढत आहेत. संघर्ष अटळ आहे पण ते थकत नाहीत,माघार घेत नाहीत कारण ती बुद्धाच्या आदर्शाचे अनुसरण करतात म्हणून ते भविष्य घडवत आहेत,असे गौरवउदगार ३१व्या बौद्ध धम्म महापरिषदेचे अध्यक्ष पूज्य भदंत उपगुप्तजी महाथेरो यांनी काढले. ते पुढे म्हणाले पंचशील हे फक्त बौद्धांच्यासाठी नसून जगातील सर्व मानवांसाठी आहे.भारतात तर पाठ्यपुस्तकाच्या पहिल्या पानावर पंचशील यायला हवे.प्रसन्न होणं हे श्रद्धेचे लक्षण आहे. बुद्ध हे महाकरूनिक आहेत त्यांना मारायला येणाऱ्यांचेसुद्धा ते कल्याण चिंतितात. जगात शांती आणि सुख बुद्धाच्या धम्मानेच येणार आहे, म्हणून बुद्ध विचाराचे आचरण होणे आवश्यक आहे. पाय हे नेहमी जमिनीवरच असतात म्हणून पायाची पूजा होते. राग,लोप,द्वेष,तृष्णा याला औषध नाही, पण ते ज्या मनातून येतात त्यांना शुद्ध ठेवण्याचे काम बुद्द्ध धम्मातच आहे. यावेळी पू.भदंत यश्यकश्यपायन महाथेरो,पू.भदंत ज्ञानरक्षित थेरो,पू.भ.डॉ.एम.सत्यपाल यांनी धम्मदेसना दिली.
सकाळचा सत्रात शिरोळ पंचायत समोर महामानवांच्या पुतळ्यास अभिवादन करून शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह पाटील व भिक्खू संघाच्या हस्ते धम्मज्योत प्रज्वलित करण्यात आली. दुपारच्या सत्रातील सामाजिक न्याय परिषदेचे उदघाटन नामदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते झाले. प्रलंबित आशा राजगृह सांस्कृतिक सभागृहसाठी राहिलेली उर्वरित रक्कम यासह आणखी ज्यादाची दीड कोटी इतक्या रक्कमेचा नवा प्रस्तावही समाजकल्याण विभागाकडे सादर करावा ते मंजूर करण्यासाठी पाठपुरावा करण्याचे अभिवचन त्यांनी दिले.याचबरोबर छ. शिवाजीमहाराजांच्या पुतळ्याबरोबरच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळा या शहरात उभारू असे वचन देऊन सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंढे यांच्या हस्ते लवकरच त्याची पायाभरणी करू असे अभिवचन ना.यड्रावकरांनी दिले. दरम्यान दुपारच्या सत्रात सुर्यकांय कांबळे यांच्या बुद्ध भीम गीतांचा जल्लोष हा गायनाचा कार्यक्रम पार पडला. तसेच सायंकाळी कोलप बंधू यांचा तुफानातील दिवे हा गायनाचा कार्यक्रम पार पडला.
प्रारंभी प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष रमेश कांबळे यांनी केले. भिक्खू संघाचे स्वागत रमाई उपासिका संघाने केले. ठराव वाचन प्र.प्राचार्य डॉ.धनंजय कर्णिक यांनी केले. आभार प्रा.सुरेश भाटिया यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत कांबळे यांनी केले. यावेळी समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे, मध्यवर्ती कारागृह अधीक्षक चंद्रमनी इंदुलकर,उद्योगपती सी.आर.सांगलीकर, महापारेषणचे संचालक अनिल कोलप, आरपीआय जिल्हाध्यक्ष उत्तम कांबके, जिल्हा परिषद सांगलीचे उपअभियंता संतोष कामत,समाजकल्याण निरीक्षक प्रताप कांबळे यासह बौद्ध उपासक व उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा