दिव्या रासुरे : विशेष प्रतिनिधी
रुकडी : विद्यार्थी दशेत विद्यार्थ्यांनी अभ्यास केला पाहिजे, अभ्यासाबरोबरच विविध विषयावरील पुस्तके वाचा जीवनात यश मिळवायचे असेल तर श्रमाला पर्याय नाही मेहनत केल्याशिवाय फळ मिळत नाही याची जाणिव कायम ठेवा, आई व वडिलांच्या आपणाकडून खूप अपेक्षा असतात त्या पूर्ण करा असे मत रो.राधेशाम भुतडा यांनी व्यक्त्त केले ते येथील राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालयातील रोटरॕक्ट क्लबच्या पदग्रहण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॕ.प्रशांतकुमार कांबळे होते. स्वागत व प्रास्तविक डाॕ.हिंदूराव संकपाळ यांनी केले.रोटरॕक्ट क्लबचे सेक्रेटरी कु.लता बागडी यांनी सन २०२०-२१ या वर्षातील कार्यक्रमाचे अहवाल वाचन केले.रोटरॕक्ट क्लबचे सन २०२१-२२ चे अध्यक्ष म्हणून कु.सकिना नदाफ तर सेक्रेटरी म्हणून श्री.अशपाक मणेर यांची निवड करण्यात आली. यावेळी रोटरी क्लब आॕफ इचलकरंजी सेंट्रलचे अध्यक्ष रो. यतिराज भंडारी , सेक्रेटरी रो.राजू तारदाळे रो.सुरेश रोजे उपस्थित होते. यावेळी महाविद्यालय आणि रोटरी क्लब आॕफ इचलकरंजी सेंट्रल आणि अभय दूध इचलकरंजी यांच्या मध्ये सामंजस्य करार करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.अपर्णा बिरांजे हीने केले तर आभार कु. तैसिन नदाफ यांनी व्यक्त्त केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा