नेत्र तपासणी प्रसंगी प्राचार्य डॉ. कांबळे व अन्य मान्यवर |
जीवन आवळे : विशेष प्रतिनिधी
रुकडी : येथील राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना, रोटरी क्लब आॕफ इचलकरंजी सेंट्रल,रोटरी क्लब आॕफ गार्गीज कोल्हापूर,दीपाली आॕप्टीशियन इचलकरंजी, नॕब नेत्र रुग्णालय मिरज आणि ग्रामपंचायत मौजे वडगाव यांच्या वतीने मोफत नेत्र तपासणी, अल्प दरात चष्मे वितरण व अल्प दरात नेत्र शस्त्रक्रिया शिबिर मौजे वडगाव ता. हातकणंगले येथे आयोजित करण्यात आले. या शिबिरात एकूण ६७ स्त्री-पूरुषांच्या डोळ्यांची तपासणी नॕब नेत्र रुग्णालय मिरज आणि दीपाली आॕप्टीशियन इचलकरंजी येथील नेत्र तज्ञ यांनी केली. गरजूंना अल्प दरात चष्मे उपलब्ध करुन देण्यात आले तर १० रुग्णांना नॕब नेत्र रुग्णालय मिरज येथे नेत्र शस्त्रक्रियासाठी पाठविण्यात आले.
या शिबिर प्रसंगी सरपंच श्री. काशिनाथ कांबळे , उपसरपंच श्री. सुभाष अकिवाटे , रो. यतिराज भंडारी, रो.राजू तारदाळे, रो. दीपीका कुंभोजकर, रो.अनघा पेंढारकर, रो.राजू थोरवत, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायतचे कर्मचारी, राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालय रुकडीचे प्राचार्य डाॕ. प्रशांत कांबळे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डाॕ.गिरीश मोरे, डाॕ. अशोक पाटील, श्री. सुरज रजपुत व डाॕ. उत्तम पाटील उपस्थित होते.
या शिबिर आयोजनामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त्त केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा