Breaking

गुरुवार, ९ डिसेंबर, २०२१

रोटरीचे अध्यक्ष रो. यतिराज भंडारी यांनी मोठ्या बंधूंच्या स्मृतिप्रित्यर्थ दोन काॕम्प्युटर व एक प्रिंटर रुकडी कॉलेजला दिली भेट




मा.रो.यतीन भंडारी यांनी रुकडी कॉलेजला दिला कॉम्प्युटर-प्रिंटर भेट

*हिना मुल्ला : विशेष प्रतिनिधी*


रुकडी : येथील राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालयास इचलकरंजी येथील प्रसिद्ध व्यावसायिक व रोटरी क्लब ऑफ इचलकंरजी सेंट्रलचे अध्यक्ष रो. यतिराज भंडारी यांनी त्यांचे मोठे बंधू दामोदर नारायणदास भंडारी यांच्या स्मृति प्रित्यर्थ एक लाख रुपये किमतीचे दोन काॕम्प्युटर व एक प्रिंटर महाविद्यालयास भेट दिले. यावेळी रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रलचे सेक्रेटरी रो. राजू तारदाळे रो. राधेशाम भुतडा अभय दूध व मिल्क प्रॉडक्ट इचलकरंजीचे रो. सुरेश रोजे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रशांत कांबळे, शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

     याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांत कांबळे म्हणाले, महाविद्यालयास काॕम्प्युटर व प्रिंटरची आवश्यकता होती. रो. यतीराज भंडारी यांनी महाविद्यालयाची ही गरज ओळखून काॕम्प्युटर व प्रिंटर भेट दिले या काॕम्प्युटरचा व प्रिंटरचा उपयोग निश्चितपणे विद्यार्थी व महाविद्यालयास चांगला होईल. महाविद्यालयातील शिक्षक व प्राचार्य डाॕ.प्रशांत कांबळे यांनी रो.यतिराज भंडारी यांचे आभार व्यक्त्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा