जयसिंगपूर पोलिसांनी चोरांच्या मुसक्या आवळल्या |
*प्रविणकुमार माने : उपसंपादक*
जयसिंगपूर : झेले हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मधील चोरीप्रकरणी संशयित आरोपीला अटक करण्यात आली असून तीन दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली. जयसिंगपूर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांचे तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.झेले हायस्कूल ज्युनिअर कॉलेज मध्ये फेब्रुवारी महिन्यात झालेल्या चोरीप्रकरणी आरोपीना अटक करण्यात आली आहे. येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली एक लाख वीस हजार रुपयांची रोकड लंपास केली होती.१३ फेब्रुवारी च्या मध्यरात्री चोरी झाली होती संशयित आरोपी शेखर पुजारी वय वर्ष ६१ रा.सुखवस्तू जवाहरनगर आनंद सोसायटी रूम नंबर १५ मुंबई पूर्व व पत्ता मेगलोर कुस्ती ता.कापूपोस्ट उचलला असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. कराड शहर पोलीस ठाण्यात अटकेत असलेल्या पुजारीने गुण्याच्या तपासात जयसिंगपूर येथे हायस्कूलमध्ये चोरी केल्याची कबुली दिली होती. त्यानंतर त्याला मंगळवारी ताब्यात घेण्यात आलं होतं पण दुपारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले.
मुख्याध्यापक दादासाहेब पांडुरंग पाटील वय वर्ष ५६ राहणार जुना बुधगाव रस्ता रेल्वे गेट जवळ विकास नगर, सांगली यांनी फिर्याद दिली होती.लोखंडी तिजोरीत विद्यार्थ्यांना ने- आण करण्यासाठी शिक्षकाकडून रक्कम जमा करून ठेवली होती. तसेच संशयित चोरट्याने ऑफिसचे कुलूप तोडून आत प्रवेश करून व लोखंडी तिजोरी उचकटून रोख रक्कम पळवली होती. आज दुपारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. विशेष सरकारी वकील एडवोकेट सूर्यकांत मिरजे यांनी युक्तिवाद करून ४ दिवसाची पोलीस कोठडी मंजूर करावी अशी मागणी केली होती.या नुसार पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील करीत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा