Breaking

शुक्रवार, ३१ डिसेंबर, २०२१

*अत्यंत दुर्देवी !जयसिंगपूरच्या शाहूनगर भागातील १८ वर्षीय युवक अज्ञात वाहनाच्या धडकेत ठार*


21 वर्षीय युवकाचा अपघातामध्ये मृत्यू


*प्रविणकुमार माने : उपसंपादक*


     जयसिंगपूरातील शाहूनगर भागातील १८ वर्षीय युवक हॉटेल सुमंगल जवळ सांगली - कोल्हापुर रोडवर अपघातात ठार झाल्याची  माहिती समोर येत आहे आहे.कोल्हापूर- सांगली महामार्गावरील चिपरी हद्दीत असलेल्या हॉटेल सुमंगल जवळ झालेल्या अपघातात युवकाचा मृत्यू झाला.

     याबाबत अधिक माहिती अशी की, सांगली-कोल्हापूर मार्गावरून मंगळवारी सायंकाळी ७.०० सुमारास आयाज मुल्ला वय वर्ष २१ हा त्या मार्गवरून जयसिंगपूरकडे येत असताना अज्ञात वाहनाच्या धडकेत अपघात झाला त्यात आयाज हा गंभीर जखमी झाला होता त्याला तत्काळ सांगली येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान रात्री १२.००च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला त्याच्या मागे आई-वडील व बहीण असा परिवार आहे.

       त्याच्या मृत्यूने शाहूनगर व जयसिंगपूर शहर परिसरात शोककळा पसरली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा