भारतीय अर्थव्यवस्था एक दृष्टिक्षेप या विषयावरील भीती पथकाचे उद्घाटन |
जीवन आवळे : विशेष प्रतिनिधी
अर्थशास्त्र विभागाच्या वतीने भारतीय अर्थव्यवस्था एक दृष्टिक्षेप या विषयाच्या अनुषंगाने अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी भितीपत्रकेची निर्मिती केली. त्यानुसार अर्थशास्त्र विभागात भितीपत्रक उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक म्हणून मा.प्रा.डॉ.एस. बी. बनसोडे हे होते. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. प्रभाकर माने हे होते.
भित्तीपत्रक कार्यक्रमाच्या वेळेस विविध क्षणचित्रे |
सदर भित्तिपत्रक प्रदर्शनात भारतीय अर्थव्यवस्थेला स्पर्श करणारे असंख्य भित्तीपत्रके प्रदर्शित करण्यात आली. सुरुवातीस प्रमुख पाहुणे व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर डॉ. एस. बी. बनसोडे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. त्यांनी आपल्या मनोगतात भारतीय अर्थव्यवस्थेची सांगोपांग माहिती दर्शविणारी ही भितीपत्रके होती. सदर कार्यक्रमास डॉ. नितिश सावंत, प्रा.एस.जी.संसुद्धी, डॉ. के.डी. खळदकर, प्रा.एस.बी. डफळापूरकर, प्रा. परशुराम माने, डॉ. व्ही.बी.देवकर, प्रा.पी.एस. चौगुले व प्रा. सौ. विद्या पाटील उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार निखिल कांबळे या विद्यार्थ्यांना मानले. सदर कार्यक्रमास १० प्राध्यापक व ११ विद्यार्थी सहभागी होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा