मयत प्रशांत भिसे याचा मृतदेह कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळला |
*प्रविणकुमार माने : उपसंपादक*
जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील दानोळी गावातून बेपत्ता झालेल्या युवकाचा मृतदेह कोथळीतील कचर्याच्या ढिगार्यात मिळाला. दानोळी व परिसरात एकच खळबळ माजली आहे.
अधिकृत सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, दानोळीतील युवकाचा खून करून मृतदेह जाळून कचरा डेपोत विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. मयत प्रशांत संजय भिसे वय वर्ष २८ या युवकाची मोटरसायकल गुरुवार विहिरीत आढळून आली होती त्या पाठोपाठ शुक्रवारी कोथळी ता.शिरोळ गावच्या हद्दीत मयत भिसे यांचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आला. दरम्यान बुधवार रात्री मित्रांचे झालेल्या वादातून भिसे यांचा खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून अधिक शोध जयसिंगपूर पोलीस घेत आहेत.
त्यांना मिळालेली माहिती अशी की, बुधवारी रात्री दोन वाजल्यापासून प्रशांत बेपत्ता असल्याची नोंद गुरुवारी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात झाली होती. गुरुवारी सायंकाळी दानोळी जयसिंगपूर रोड वरील खर्डेकर यांच्या विहिरीत प्रशांत यांची मोटरसायकल आढळून आली. पोलिसांनी दोरखंडाच्या आधारे सदर मोटरसायकल काढण्यात आली. चाळीस फूट खोल असलेल्या विहिरीतील पाणी मोटार लावून उपसण्यात आले परंतु प्रशांतचा पत्ता लागत नव्हता. मात्र शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास कोथळी ता. शिरोळ येथे मंगोबा देवालयाच्या रस्त्यालगत असणाऱ्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात प्रशांतचा अर्धवट जळालेला मृतदेह मिळून आला. घटनास्थळी यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर वैंजने, पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघ यांच्यासह पथकाने धाव घेऊन घटनेची पाहणी केली. घटनास्थळी शवविच्छेदन केले पोलीस कॉन्स्टेबल विजय पाटील, निलेश मांजरे, अस्लम मुजावर बाबाचंद पटेल व मंगेश पाटील यांच्यासह पोलिस कर्मचारी उपस्थित होते याबाबतची नोंद जयसिंगपूर पोलीस ठाण्यात झाली आहे.
या विकृत खुन्याच्या घटनेने शिरोळ तालुक्यात संताप व भितीदायक वातावरण निर्माण झाले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा