जयसिंगपूरात धम्म परिषदेचे आयोजन |
जीवन आवळे : विशेष प्रतिनिधी
जयसिंगपूर : येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर बौद्ध संस्कार मंडळाने पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे बुध्दविहार असून येथे सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक असे विविध उपक्रम राबविले जातात. यात प्रामुख्याने नालंदा सार्वजनिक ग्रंथालय, प्रबुद्ध भारत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र,रमाई उपासिका केंद्र, बौद्ध वधूवर सूचक केंद्र, कमलापती विद्यार्थी वसतीगृह व पंचशील नागरी पतसंस्था या संलग्न संस्थाच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. महाराष्ट्र शासनाच्या आर्थिक सहाय्यातून राजगृह सांस्कृतिक भवनाचे बांधकाम पूर्णत्वास जात आहे. प्रतिवर्षी या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आबेडकर बौध्द संस्कार मंडळाच्या वतीने धम्म महापरिषदेचे आयोजन केले जाते. गेल्या वर्षी कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे ही परिषद होवू शकली नव्हती. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी या परिषदेचे आयोजन करण्यात येते चालू वर्षी रविवार दि. १९ डिसेंबर २०२१ रोजी या धम्म परिषद आणि त्याच बरोबर सामाजिक न्याय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळच्या पहिल्या सत्रात पूज्य भक्[संपायी मार्गदर्शनपर धम्म देसना होणार आहे. यात पू.भधम्मपरिषदेचे अध्यक्ष डॉ. उपगुप्तजी महास्थविर (पूर्णा) पू.म.डॉ.यश कश्यपायन महास्थविर धम्म मार्गदर्शक (जयसिंगपूर) धम्म परिषदेचे उदघाटक पूभ, डॉ. एम. सत्यपाल महास्थविर (औरंगाबाद) पू.भ. सुगतपाल महास्थविर (मुंबई). पू.भ. ज्ञानरक्षीतस्थविर (औरंगाबाद ) पू.भविमलकीर्ती (नागपूर) पू.भ.आरआनंदस्थतिर (वसगडे). पू.भ.पय्यानंद (लातूर), पू.भ.संबोधी (बसगडे). पू.म.राहूल (वसगडे) यांच्या धम्म देसना होतील.
दुपारी दुस-या सत्रात सामाजिक न्याय परिषदेचे आयोजन केले आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. सतेज उर्फ बंटी पाटील (गृहराज्यमंत्री महाराष्ट्र राज्य व पालकमंत्री कोल्हापूर), स्वागताध्यक्ष मा.ना. राजेंद्र पाटील यड्रावकर (आरोग्य राज्य मंत्री, महाराष्ट्र राज्य) उद्घाटक मा. हसन मुश्रीफ, (ग्रामविकास मंत्री, महाराष्ट्र राज्य), मा. खा. धैर्यशील माने (हातकणंगले लोकसभा ). माजी आमदार मा. उल्हासदादा पाटील, मा. गणपतरावदादा पाटील (चेअरमन, दत्तसाखर, शिरोळ ). नगराध्यक्षा मा. डॉ. नीता माने, उपनगराध्यक्ष मा. संजय पाटील यड्रावकर, उद्योगपती मा. सी. आर. सांगलीकर तसेच सर्व नगरसेवक व मान्यवर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
शिरोळ येथील पंचायत समितीच्या प्रांगणातून धम्म ज्योतीचे आगमन कार्यक्रमस्थळी होईल व धम्म ध्वजारोहण झाल्यानंतर बोधीवंदना होवून कार्यक्रमास प्रारंभ होईल. वैशालीबुध्द विहार, लुबिनोवन, धम्मनगर जयसिंगपूर येथे कार्यक्रम संपन्न होईल.
धम्म परिषदेत सर्वांनी कोरोना नियमांचे पालन करून सहभागी व्हावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष आयु रमेश कांबळे व सचिव आयु, शशिकांत माळगे तसेच सर्व संचालक मंडळाने केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा