व्याख्यानात मार्गदर्शन करताना डॉ.नीता नरके |
*हिना मुल्ला : विशेष प्रतिनिधी*
रुकडी : येथील राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालय आणि संभाजीराव माने गर्ल्स हायस्कुल व ज्युनियर महाविद्यालयातील विद्यार्थीनी साठी आयोजित केलेल्या व्याख्यानात प्रमुख वक्त्त्या म्हणून बोलत होत्या. अध्यक्षस्थानी प्राचार्या सौ. उज्ज्वला अमर बुल्ले होत्या.
" वयात येताना मुलींना घ्यावयाची काळजी " या विषयावर मार्गदर्शन करताना डाॕ. निता नरके म्हणाल्या की,विवाहानंतर स्त्रीयांना कुटुंबातील बहुतेक सर्व जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात, संसारात या जबाबदाऱ्या टाळूनही चालत नाहीत, आयुष्यभर पार पाडाव्या लागणाऱ्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडण्याची तयारी मुलींनी शालेय व महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना केली पाहिजे.त्यासाठी योग्य आहार, योग्य पोशाख, निटनेटकेपणा आणि उत्तम विचार यांची सवय लावली पाहिजे असे मत डाॕ. निता नरके यांनी व्यक्त्त केले.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक अंतर्गत तक्रारी समितीच्या प्रमुख डाॕ.शर्मिला साबळे यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय प्राचार्य डाॕ.प्रशांतकुमार कांबळे यांनी करुन दिला.
अध्यक्षीय भाषणात सौ.उज्ज्वला बुल्ले म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनींना कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास त्या आपल्या शिक्षिकांना सांगाव्यात त्या आम्ही सोडवू आम्ही शिक्षिका मातापाल्याच्या भुमिकेतून तुमच्या समस्या सोडवू. या कार्यक्रमास रो.दिपीका कुंभोजकर रो. अनघा पेंढारकर, दोन्ही महाविद्यालयातील विद्यार्थीनी, शिक्षिका उपस्थित होत्या. आभार कु.अपर्णा बिरांजे हीने मानले तर सूत्रसंचालन कु.तौसिन खतिब हीने केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा