Breaking

बुधवार, २९ डिसेंबर, २०२१

*जयसिंगपूरातील चिपरी येथे घडली घटना ; प्रेम विवाह केला म्हणून कुटुंबीयांनी मुलग्यावरच केला खुरप्याने वार*

 

जयसिंगपूर पोलीस ठाणे


प्रविणकुमार माने : उपसंपादक


 जयसिंगपूर :  चिपरी बेघर वसाहतीमधील मुलाने केलेला प्रेम विवाह मान्य नसल्याने आई व बहिणीने रागाच्या भरात खुरप्यान वार केला .आई-बहिणीने हे कृत्य केल्यानंतर आई बहिणीवर विरुद्ध जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

         चिपरी बेघर वसाहतीमधील राहत्या घरात जवळ सोहेल इलाई मुल्ला वय वर्ष २२ व्यवसाय गवंडीकाम रा.राजीव गांधीनगर आठवी गल्ली ता. शिरोळ येथील बेघर वसाहतीत रात्री १०.३० वाजता घडली आहे. सौ शरीफा ईलाही मुल्ला आणि आसमा इलाही मुल्ला दोन्ही रा. चिपरी बेघर वसाहत अशी संशयित आरोपींची नावे आहेत. आरोपीच्या राहत्या घरासमोर ही घटना घडली.

      जयसिंगपूर पोलीस ठाणे कडून मिळालेली माहिती अशी, सदर  फिर्यादीचा प्रेम विवाह झालेला असून कुटुंबांना तो मान्य नाही तरी तारखेस वेळी व ठिकाणी यातील आरोपी आणि फिर्यादी तू तुझ्या बायकोला घरात राहतो म्हणून शिवीगाळ करून संशयित आरोपीने फिर्यादीस आसमा मुल्ला घेणे पाठीमागून धरले व संशयित आरोपी शरीफा मुल्ला हिने हातातील लोखंडी खुरप्याने डोक्यात पुढील बाजूस डाव्या साईडला मारून गंभीर जखमी केले असे फिर्यादीत म्हटले आहे.

   पोलीस नाईक सनदी अधिक तपास करीत आहेत. भारतीय दंड विधान कलम ३२४,३२३ व ५०४ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

    या घटनेने चिपरी व परिसरात खळबळ माजली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा