Breaking

गुरुवार, २ डिसेंबर, २०२१

कोल्हापूर काँग्रेसचे आमदार व उद्योजक चंद्रकांत जाधव यांचे निधन

 

कै.चंद्रकांत जाधव



   कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार उद्योजक चंद्रकांत जाधव यांचे गुरुवारी निधन झाले. पोटात इन्फेक्शन असल्याने गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर हैदराबाद येथील रुग्णालयात उपचार सुरु होते. 

      सोमवारी हैदराबाद येथील रुग्णालयात त्यांच्यावर  यशस्वी शस्त्रक्रिया झाली होती. परंतु शस्त्रक्रियेनंतर त्यांची प्रकृती उपचाराला साथ देत नव्हती. त्यातच आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन झाले.

     दुपारी एक पर्यंत त्यांचे पार्थिव कोल्हापुरात आणण्यात येणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.                  फुटबॉललच्या माध्यमातून कोल्हापूर शहरातील अनेक तालीम मंडळाशी त्यांचा थेट संपर्क होता. त्याबरोबरच राजकीय व सामाजिक कार्यातून त्यांनी मोठा जनसंपर्क निर्माण केला होता. 

      २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत जाधव यांनी काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवून विजय प्राप्त केला होता. पहिल्यांदाच निवडणूक लढवून त्यांनी हे यश मिळवले होते.

    मागच्या दीड वर्षात त्यांना दोन वेळा कोरोनाची लागण झाली होती. त्यातून ते ठणठणीत बरे झाले होते. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांना पुन्हा त्रास होऊ लागल्याने हैदराबाद येथील रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचार सुरू असताना त्यांचे दुर्दैवी निधन झाले.

      उद्योजक जाधव यांच्या निधनाबद्दल कोल्हापूर शहर व जिल्ह्यातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा