Breaking

शुक्रवार, १० डिसेंबर, २०२१

जयसिंगपूरच्या परिवार स्टील सेंटर या दुकानात १४ लाख ७० हजारच्या भांड्याची चोरी


जयसिंगपूरात चोरी 


प्रविणकुमार माने : उपसंपादक


        जयसिंगपूर नगरपालिकेच्या गाळ्यातील परिवार स्टील सेंटर मध्ये १४ लाख ७० हजारच्या भांड्याची चोरी करून कामगारांनी परस्पर विक्री केली भांडे आहे. दुकानातील नोकरांनी गेल्या तीन वर्षात परस्पर १४ ला ७० हजारांवर भांड्यांची परस्पर विक्री केल्याची फिर्याद जयसिंगपूर पोलिसांनी दिले आहे. 

       सन २०१८ ते ५ सप्टेंबर २०१९ या कालावधीत चोरी  झाल्याची माहिती दिली. कामगार आनंद  सुभाष दानोळे व भांडे विकत घेणारा केमनूर रामचंद्र गोंधळी दोघे राहणार जयसिंगपूर यांच्या विरोधातील परिवार सेंटरचे मालक संजय जनार्दन पाचंगे वय वर्ष ३४ गल्ली नंबर ११ रा. जयसिंगपूर यांनी  जयसिंगपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जयसिंगपूर नगरपालिका शाळा नंबर ३ मध्ये फिर्यादी यांच्या मालकीचे परिवार स्टील सेंटर आहे त्या दुकानात आनंद  सुभाष दानोळे हे कामगार असून इतर कामगार व फिर्यादी त्यांना विश्वासात घेऊन त्यांचा विश्वास संपादन करून दुकानात वरील तारखेच्या वेळी साहित्य चोरून घेऊन आरोपी विकत असे. त्यांना दुकानातील साहित्य कमी झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने आरोपी यांच्याकडे चौकशी केली त्यानंतर त्याने गुन्हा कबूल केला.  फिर्यादीत म्हटले आहे त्याप्रमाणे सदर आरोपीने असंख्य पितळी वस्तू व भांडी या मुद्दे मालाची परस्पर विक्री केली आहे. पुढील तपास जयसिंगपूर पोलीस करीत आहे.

   या घटनेने सर्वत्र खळबळ माजली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा