शेडशाळ मध्ये एक अल्पवयीन मुलीवर अत्याचार |
रोहित जाधव/शिरोळ तालुका प्रमुख प्रतिनिधी
शिरोळ तालुक्यातील शेडशाळ या गावात एका अल्पवयीन मुलीवर विवाहित तरुणाने अतिप्रसंग केल्याची घटना आज दुपारी उघडकीस आली आहे. अभिजित सुभाष नाडगौडा वय वर्ष 34 असे या नराधमाचे नाव आहे. ग्रामस्थांनी चोप देऊन त्याला कुरुंदवाड पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. या घटनेने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून घटनास्थळी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, अभिजित नाडगौडाचे शेडशाळ येथील महादेव स्वामी मठासमोर गोळ्या बिस्किट तसेच किराणाचे दुकान आहे. आज दुपारच्या सुमारास अल्पवयीन मुलगी त्याच्या दुकानात आली असता आत बोलावून तिच्यावर अतिप्रसंग केला. याबाबतची माहिती पिडीत मुलगीने घरी जाऊन सांगितल्यानंतर सदरचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी त्या नराधमाला पकडून चांगलाच चोप देवून त्याच्या दुकानाची तोडफोड केली. या घटनेची माहिती मिळताच कुरुंदवाड पोलिसांनी घटनास्थळी कडक बंदोबस्त ठेवला आहे. घटनास्थळी इचलकरंजीचे पोलीस उप अधीक्षक बी बी महामुनी यांनी भेट देवून पिडीत मुलगीला तातडीने उपचारासाठी दत्तवाड ग्रामीण रुग्णालयात पाठविले आहे.
या घटनेमुळे गावात अद्यापही तणावाचे वातावरण असल्यामुळे कोल्हापूरहून विशेष पोलीस पथकालाही पाचारण करण्यात आले आहे. या संशयित आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी ग्रामस्थांतून मागणी होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा