संग्रहित छायाचित्र |
कोल्हापूर : आज (दि. 6 डिसेंबर) रोजी, गोपाळ कृष्ण गोखले महाविद्यालय कोल्हापूर येथे, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत,एनएसएस विभाग आणि एनसीसी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. ( Gopal Krishna Gokhale collage, Kolhapur)
कार्यक्रमाचे अध्यक्ष कॉलेज चे प्राचार्य डॉ. पी. के. पाटिल यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.
कार्यक्रम प्रसंगी "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि आजची तरुण पिढी" या विषयावर बोलताना या कार्यक्रमाचे संयोजक डॉ. एम. के. पवार सर यांनी आपले विचार व्यक्त करताना 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान निर्मिती करून सर्व भारतीयांच्या विचारांना योग्य दिशा दिली आहे. याचा उपयोग सर्व तरुण तरुणींनी संविधानाचा अभ्यासपूर्वक वाचन करून योग्य रीतीने स्वतच्या उन्नतीसाठी अंमलात आणला पाहिजे.' असे संगीतले.
या कार्यक्रमाचे संयोजन एनएसएस प्रोग्रॅम ऑफिसर डॉ. एम. के. पवार, प्रा. राक्षसे सर, एनसीसी ऑफिसर प्रा. डी. के. नरळे यांनी केले होते.
कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती उपप्राचार्य श्री. पिसाळ सर, नॅक समन्वयक डॉ. आवळे, एनएसएस कार्यक्रम अधिकारी डॉ. सौ स्मिता गिरी, प्रा. अजित गाइंगडे, प्रा. आर पी. जाधव, प्रा. मेंडशे सर, प्रो. ए. ए. कुलकर्णी, नॅक सदस्या डॉ. सौ. शुभांगी लेंडवे, डॉ. सौ. आर. पवार, डॉ. सौ पाटोळे, डॉ. सौ. पाटिल, प्रा. डी. एस. कांबळे, प्रा. जयंत खानापूरकर , प्रा. भूयेकर, प्रा. डाके आणि एनसीसी कडेट्स, एनएसएस विदयार्थी यांची होती.
या कार्यक्रमासाठी, शिक्षण प्रसारक मंडळ सर्व माननीय सदस्य, सेक्रेटरी मा. प्रा. जयकुमार देसाई, पेट्रोन कौन्सिल मेंबर मा. दौलत देसाई आणि ॲडमीनिस्ट्रेटिव ऑफिसर डॉ. सौ. मंजिरी मोरे यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.
शिवाजी विद्यापीठ एनएसएस सल्लागार समिती सदस्य डॉ सौ. स्मिता सुरेश गिरी यांनी उपस्थित सर्व शिक्षक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी यांचे आभार व्यक्त केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा