Breaking

मंगळवार, ७ डिसेंबर, २०२१

महावीर महाविद्यालयांमध्ये नेट/ सेट मुक्त प्राध्यापकांचा विजयी मेळावा ; प्राध्यापकांना पेन्शन मिळणे हे सुटाचे सुयश- प्रा.टी.व्ही.स्वामी

 

मेळाव्यात मार्गदर्शन करताना प्रा.स्वामी व प्रा. मानकर


प्रा.डॉ.प्रभाकर माने :  मुख्य संपादक


कोल्हापूर :  शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघ (सुटा) तर्फे नेट/सेट मुक्त प्राध्यापकाची पेन्शन योजना, डी.सी. पी.एस., एम.फिल., पीएच.डी. याचिका, अतिरिक्त शिक्षक माहिती व विविध शासन निर्णय या सर्व विषयांना स्पर्श व विस्तृत विवेचन करणारा विजय भव्य मेळावा महावीर महाविद्यालय, कोल्हापूर येथे पार पाडला. या मेळाव्यास प्रा. एस.जी.पाटील(बाबा),प्रा.सुधाकर मानकर,प्रा. टी. व्ही. स्वामी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी प्रा.डॉ. आर. के. चव्हाण होते.

      सुरुवातीस कोल्हापूर जिल्हा सुटा अध्यक्ष प्रा.डॉ.अरुण पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. त्यानंतर प्रास्ताविकात ते म्हणाले, सन १९९५ ते २०२१ पर्यंत सेट/ नेट मुक्त प्राध्यापकांच्या पेन्शनचा संघर्षमय प्रवास व अंतिम लढा शासनाच्या पेन्शन लागू करण्याच्या  निर्णयाने  संपला. मात्र या पेन्शन संदर्भात व इतर अनेक विषयांच्या बाबतीत मनातील शंका-कुशंकाचे निरसन करण्यासाठी मेळाव्याच्या आयोजनाचा हेतू स्पष्ट केला. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते रोपांस जलार्पण करून मेळाव्यास सुरुवात झाली .

    मेळाव्याच्या प्रथम सत्रात नेट / सेट मुक्त प्राध्यापकांचा पेन्शन विषयी मार्गदर्शन करताना कोल्हापूर जिल्हा समन्वयक प्रा.सुधाकर मानकर म्हणाले, 'सुटा व एम्फुकटोने १९९४ पासून आंदोलन पुकारले व आज पर्यन विविध टप्प्यावर चालू राहिले. त्या दीर्घ संघर्षमय लढ्याचा हा विजय आहे. सुटा संघटना  प्राध्यापकांच्या न्याय व हक्कासाठी आक्रमक असल्याने सातत्याने लढत राहिली व लढत राहणार अशा प्रकारे त्यांनी विश्वास दिला.

    द्वितीय सत्रामध्ये प्रा. टी. व्ही. स्वामी विविध विषयांचे निराकरण करताना यामध्ये नेट-सेट मुक्त प्राध्यापकाची पेन्शन योजना, डी.सी.पी.एस, एम.फिल., पीएच.डी.  याचिकाचे शासन निर्णय व सद्यस्थितीत कोर्टात असलेल्या केसेस संदर्भात तपशीलवार माहिती दिली. सुटाकडे प्राध्यापकांच्या केसचा अपडेट दिली. जुनी पेन्शन योजना कशी मिळेल याबाबत कोर्टात सुरू असलेल्या केसच्या संदर्भात माहिती दिली.

    सुटा प्रमुख समन्वयक प्रा. एस.जी. पाटील(बाबा) यांनी सुटा व आजची आव्हाने याविषयी सविस्तर माहिती दिली. यासाठी सुटाने सर्व पातळीवर दिलेल्या लढायची संपूर्ण माहिती दिली. त्यानंतर प्रश्नोत्तरे व शंकानिरसन  प्रा.स्वामी,प्रा.मानकर,डॉ.कुंभार व डॉ. कोरबू यांनी अतिरिक्त शिक्षक माहिती, विद्यापीठ कामकाज स्थाननिश्चिती व शिक्षण सहसंचालक विषयीच्या पातळीवरील घडामोडींची चर्चा केली. सुटाचे अध्यक्ष, डॉ आर. के. चव्हाण यांनी सुटा व आजची स्थिती या विषयी आपले चौफेर भाष्य करीत सुटा संघटनेच्या आवश्यकते बाबत सविस्तर विवेचन केले. 

      कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती सुटा कार्यवाह डॉ. डी. एन. पाटील, सुटा कोल्हापूर जिल्हा कार्यवाह प्रो.डॉ.डी.आर.भोसले होते.   खजिनदार डॉ.गजानन चव्हाण होते. तसेच व्यवस्थापन परिषदेचे डॉ. प्रकाश कुंभार व डॉ.आर.जी.कोरबु उपस्थित होते.

       प्रो.डॉ.डी.आर.भोसले यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले आणि डॉ.प्रभाकर माने यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.सदर कार्यक्रमासाठी १०० पेक्षा अधिक प्राध्यापक उपस्थित होते. या मेळाव्याच्या योजनेच्या हेतूबाबत उपस्थित असणाऱ्या प्राध्यापकांनी समाधान व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा