Breaking

मंगळवार, २८ डिसेंबर, २०२१

राज्यात पुन्हा एक घोटाळा : लष्करी परीक्षेचे पेपर फुटीचे प्रकरण समोर

 


मुंबई  : राज्यात पेपरफुटी संदर्भात अनेक घोटाळे समोर येत आहेत. या अगोदर टीईटी, म्हाडा आणि आरोग्य भरती परीक्षेत गैरकारभार झाल्याचं उघडकीस आल्यानंतर आता लष्करी परीक्षेचाही पेपर लिक झाल्याचं समोर आलं आहे.

          या प्रकरणी एका लेफ्टनंट कर्नलसह चौघांना सीबीआयनं अटक केली आहे. लेफ्टनंट कर्नल विकास रायझादा, हवालदार सुशांत नाहक, शिपाई आलोक कुमार आणि आलोकची पत्नी प्रियंका यांना सीबीआयच्या अँटी करप्शन युनिटनं बेड्या ठोकल्या आहेत. २०१९ साली सैन्याच्या ‘क’ दर्जाच्या पदांची भरती झाली होती. या परीक्षेची ‘Answer Key’ आरोपींकडे असल्याची माहिती सीबीआयला प्राप्त झाली होती. त्यानंतर सदर यंत्रणेकडून आरोपींवर कडक नजर ठेवण्यात आली. त्याचबरोबर कॉल रेकॉर्ड करण्यात आले. त्यात चौघांनी  ४०'००० ते ५०'००० कृपया सदर उत्तर पत्रिका विकल्याचं आढळून आलं होतं. या घटनेशी लेफ्टनंट कर्नल रायझादा आणि हवालदार नाहक हे पुण्यातील सैन्याच्या दक्षिण मुख्यालयात कार्यरत आहेत. तर अलोक कुमार हा रायझादाच्या ऑफीसमधे काम करतो. या चौघांचा २०२१ मध्ये झालेल्या सैन्य भरती घोटाळ्यात देखील सहभाग असल्याचं आढळून आलं आहे.

         सदर घटनेमध्ये लष्करी अधिकारी असल्याने एकच खळबळ माजली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा