Breaking

शुक्रवार, २४ डिसेंबर, २०२१

*सांगली- कडेपुर येथील निवरी गावात चारचाकी गाड्यांच्या भीषण अपघात ; तीन जणांचा जागीच मृत्यू ; एक जण गंभीर जखमी*


कडेपुर तालुक्यातील निवरी येथे भीषण अपघात


*प्रविणकुमार माने : उपसंपादक*


  सांगली  : सांगली- कडेपुर येथे चारचाकी गाड्यांच्या भीषण अपघात झाला असून यामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याचं समोर येत आहे. तर एक जण गंभीर जखमी आहे.

मयत सुदर्शन निकम

    प्राप्त झालेल्या माहितीनुसार, विटा येथील सुदर्शन निकम यांच्यासह डोंगरसोनी येथील दाम्पत्याचा मृत्यू झाला आहे. तासगाव तालुक्यातील डोंगर सोनी येथील रहिवासी विटा येथील कॉन्ट्रॅक्टर गजानन निकम यांचे सुपुत्र सुदर्शन निकम आणि संग्राम संजय गायकवाड हे दोघे आज शुक्रवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास खेराडे येथून विटाकडे येत आणि तासगाव तालुक्यातील डोंगर सोनी येथील कपिल माणिक झांबरे आणि त्यांच्या पत्नी आपल्या नातेवाईकांसह तासगावहुन पुणे येथे निघाले होते. यावेळी कडेगाव तालुक्यातील निवरी या गावात या दोन्ही वाहनांचा समोरासमोर भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. त्यानुसार गजानन निकम यांचे सुपुत्र सुदर्शन निकम आणि डोंगरसोनी येथील कपिल माणिक झांबरे आणि त्यांच्या पत्नी धनश्री झांबरे यांचा मृत्यू झाला आहे. अपघातातील वाहनांचा चक्काचूर झाले असून या अपघातात प्रज्वल पुंडलिक झांबरे हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी सांगली येथे हलविण्यात आले.

      या भीषण अपघाताने सर्वत्र शोककळा पसरली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा