Breaking

बुधवार, ८ डिसेंबर, २०२१

अवघ्या एका मिनिटात कोणत्याही वेदनेविना इच्छामृत्यू देणाऱ्या मशीनला या देशाची मंजुरी

 

मशीन ऑफ डेथ



     स्वित्झर्लंडने इच्छामरणाला कायदेशीर मान्यता दिली आहे. आणि याच पार्श्वभूमीवर स्वित्झर्लंड सरकारने एका खाजगी कंपनीद्वारा बनवलेल्या सुसाईड मशीनच्या वापराला कायदेशीर मान्यता दिली आहे. मशिनच्या मदतीने कोणत्याही वेदनेविना केवळ एका मिनिटात व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो, असा मशीन बनवणाऱ्या कंपनीचा दावा आहे.या मशीनला सारको (Sarco) असे नाव देण्यात आले असून या मशिनला ' मशीन ऑफ डेथ ' असे संबोधण्यात येत आहे.

      एक्झिट इंटरनॅशनल (Exit International) नावाच्या संस्थेचे संचालक डॉ. फिलीप निट्स्के (Dr Philip Nitschke) यांनी हे ‘मशीन ऑफ डेथ’ तयार केले आहे. त्यांना ‘डॉ. डेथ’ असेही संबोधले जाते.

     गेल्या वर्षी स्वित्झर्लंडमध्ये 1,300 नागरिकांनी इतरांच्या मदतीने आत्महत्या केल्याचा दावा एक्झिट इंटरनॅशनलने केला आहे.


       आजारपणामुळे हालचाल करु शकत नसलेल्या व्यक्तींसाठी हे मशीन बनवण्यात आल्याचं बोललं जातं. ब्रिटिश वेबसाईट इंडिपेंडंटच्या रिपोर्टनुसार, हे मशीन आतूनही चालवता येते. आजारी व्यक्तीही मशीनच्या आत डोळे मिचकावून हे यंत्र ऑपरेट करु शकते. ऑक्सिजनची पातळी कमी कमी होत जाऊन एका मिनिटात मृत्यू होतो. या मशीनमध्ये बायोडिग्रेडेबल कॅप्सूल आहे ज्याचा वापर शवपेटी म्हणूनही केला जाऊ शकतो.

     दरम्यान, हे मशीन बनविल्याबद्दल डॉ. निट्स्के यांच्यावर टीकाही होत आहे. या मशीनमुळे लोकांना आत्महत्येसाठी प्रवृत्त होतील, असेही काही लोकांचे म्हणणे आहे. 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा