Breaking

रविवार, ५ डिसेंबर, २०२१

स्वराज्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे कार्य व उपक्रम सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या संस्था व व्यक्तीना पुढील कार्यास बळ देणारी : माजी खासदार राजू शेट्टी यांचे प्रतिपादन

 

मा.खासदार राजू शेट्टी एजाज मुजावर यांचा सत्कार करताना


जयसिंगपूर :  येथे स्वराज्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्था ता. शिरोळ जि. कोल्हापूर यांच्या वतीने संस्थेच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त राज्यस्तरीय  पुरस्कार वितरण सोहळा अत्यंत थाटामाटात संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे माजी खासदार मा.राजू शेट्टी व कार्यक्रमाच्या   अध्यक्षस्थानी कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी मा.डॉ. प्रसाद संकपाळ उपस्थित होते.

          सुरुवातीस त्यानंतर संस्थेच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या घटकांचा गौरव करणे व त्यांना पुढील कार्यास बळ देणे हा हेतू डोळ्यासमोर ठेवून हा कार्यक्रम आयोजित केला होता.

        कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी खासदार मा.राजू शेट्टी मार्गदर्शन करताना म्हणाले, शिरोळ तालुक्यात महापुराची स्थिती सातत्याने बिकट असते अशा वेळी मदतीचा हात देणारे घटक ही तेवढेच पुढे येत असतात. सामाजिक संवेदनशीलता जपणाऱ्या काही संस्था व व्यक्ती अशा भयानक संकटात मदतीला धावून जात असतात. त्यामुळे सामाजिक बांधिलकी या नात्याने  काम करणाऱ्या घटकांना बळ देणारी संस्था म्हणून स्वराज्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्था कार्य करीत आहे. या संस्थेच्या कार्याबाबत ऐकलं होतं मात्र ही संस्था त्याहून अधिक उत्तम पद्धतीनं कार्य करीत आहे हे या पुरस्काराच्या निमित्ताने दिसून येत आहे.

वर्धापन दिन कार्यक्रमातील काही क्षणचित्रे

       मा. डॉ. प्रसाद संकपाळ म्हणाले की, या संस्थेने विविध घटकातील गुणवंतांचा सत्कार करून एक प्रकारची प्रेरणा दिली आहे. ही प्रेरणा घेऊन आपण समाजात पुन्हा जोमाने कार्य करावे.

      प्रमुख उपस्थिती पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील,पोलीस उपनिरीक्षक वाघ,मा.प्रा.डॉ. प्रभाकर माने(संपादक, जय हिंद न्यूज नेटवर्क),नगरसेवक मा.श्री. पराग पाटील,नगरसेवक,मा.श्री. बजरंग खामकर, नगरसेवक शैलेश चौगुले,सौ. मनिषा नगरसेवक सर्जेराव पवार, श्री. हर्षल सुर्वे,प्रसिद्ध प्रेरक वक्ता.प्रा. तोहिद मुजावर,मा.मौलाना वसिम अकरम चौगले (तालुकाध्यक्ष, जमीअत उलमा ए हिंद) व जयसिंगपूर शहर शिवसेना प्रमुख तेजस कुराडे हे मान्यवर प्रमुख उपस्थित होते.

          संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रात गौरवास्पद कामगिरी करणाऱ्या घटकांचा यथोचित मानसन्मान राखत सत्कार करण्यात आला.यामध्ये देवदूत गौरव पुरस्कार डॉ. प्रसाद संकपाळ,डॉ. निखिल पाटील-आदर्श डॉक्टर जीवनगौरव ,नितीन परीट -आदर्श शिक्षक गौरव ,रोहित जाधव-उत्कृष्ट पत्रकार सुधार गौरव , निलेश तवंदकर व अक्षय बाबर समाजकार्य, मोबीन मुुल्ला-समाजकार्य गौरव,मंगेश घाटगे -युवा समाजकार्य गौरव,हाफिज इर्शाद शौकत शेख समाजभूषण गौरव,सचिन मोटे व  अभिजित भांदिगरे -युवा उदयोजक गौरव पुरस्कार,दिपक पाटील समाजभूषण, संदीप पाटील समाजकार्य गौरव व सागर माने-युवा समाज कार्य गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

       त्याचबरोबर वजीर रेस्क्यू फोर्सचे प्रमुख रऊफ पटेल व त्यांची टीम, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ जयसिंगपूर जयसिंग माने व त्याची टीम, जयसिंगपूर कॉलेज राष्ट्रीय सेवा योजना, अंगणवाडी सेविका धरणगुत्ती, बंडू उर्फ शुक्राचार्य उरुणकर, सदाशिव आंबी शेडशाळ व अन्य घटकांच्या सेवामय कार्यास सलाम करून कोरोना योद्धा या सन्मान पत्राने सन्मानित केले आहे.

         या कार्यक्रमाचे आभार डॉ. प्रभाकर माने यांनी मानले. आयोजनामध्ये जयसिंगपूर नगरीचे संपादक राजू सय्यद,संस्थेचे नाव लौकिक करण्यात संस्थेचे सल्लागार शिवसैनिक पत्रकार इकबाल मौला इनामदार,धडाडीचे कार्य करणारे सुरेश राठोड, उमेश कांबळे, ओम काळे,व इतर पदाधिकार्‍यांनी आयोजनामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे.

      या संस्थेने आयोजित केलेला हा पुरस्कार सन्मान सोहळा अत्यंत देखणा व प्रेरणादायी होता अशा प्रकारची चर्चा सर्वत्र होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा