संग्रहित छायाचित्र |
मुंबई : भारतीय तटरक्षक दलाने रोजगाराच्या शोधात असणाऱ्या तरुणांना साठी आनंद वार्ता दिली आहे. भारतीय तटरक्षक दलाने नाविक जीडीसह अनेक पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली असून एकूण ३२२ पदांची भरती होणार आहे. सदर पदांपैकी २६० पदे नाविक जनरल ड्युटी, ३५ पदे सेलर डीबी आणि २७ पदे मेकॅनिकलची आहेत.
मात्र,सदर अधिसूचनेनुसार अर्ज भरण्याची प्रक्रिया अद्याप सुरू झाली नसून या ३२२ पदांसाठी भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ४ जानेवारी २०२२ पासून सुरू होईल आणि १४ जानेवारी २०२२ रोजी सांयकाळी ५.०० वाजेपर्यंत राहणार आहे. या पदांसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज करण्यास व अधिसूचना पाहण्यासाठी अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता आणि अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अर्ज करू शकता.
पात्रता :
सेलर जनरल ड्युटी पदासाठी अर्ज करणारे उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळातून किंवा संस्थेतून इंटरमिजिएट उत्तीर्ण असले पाहिजेत आणि त्यांच्याकडे इंटरमिजिएटमध्ये भौतिकशास्त्र किंवा गणितदेखील असणे आवश्यक आहे. दहावी उत्तीर्ण उमेदवार नाविक पदासाठी फॉर्म देखील भरू शकतात. मेकॅनिकल पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना दहावीसह डिप्लोमा पास असणे अनिवार्य आहे. या सर्व पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय २२ वर्षे असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांनाही नियमानुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.
तरी संबंधित पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा