Breaking

सोमवार, २० डिसेंबर, २०२१

माकड - कुत्र्यांचा गँगवॉर - कुत्र्यांनी माकडाच्या पिल्लाला मारले म्हणून माकडांनी तब्बल २५० कुत्र्यांच्या पिल्लांना ठार मारले.




  माजलगाव (जिल्हा/बीड): तालुक्यातील लवुळ येथे मागील २-३ महिन्यांपासून उच्छाद मांडणाऱ्या तीन वानरांपैकी दोघांना नागपूरच्या वन विभागाच्या पथकाने शनिवारी सकाळी तासाभरातच पिंजऱ्यात जेरबंद केले. कुत्र्याने वानराचे पिलू मारल्याने वानरांनी सुरू केलेल्या सूडचक्राला अखेर लगाम बसल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.





काय झाले होते ?

    गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार काही महिन्यांपूर्वी कुत्र्यांनी व कुत्र्यांच्या पिल्लानी एका लहान माकडाच्या पिल्लास मारले होते. तेव्हापासून ही माकडे सुडभावनेने कुत्र्यांच्या पिल्लांना ठार करत होती. कुत्र्यांच्या पिल्लांना उंच इमारत किंवा झाडावर नेवून खाली टाकत होती. एक दोन नव्हे तर तब्बल २५० कुत्र्यांच्या पिल्लांना या माकडांनी मारले आहे.

    भरीत भर म्हणजे या माकडांनी गावकऱ्यांना ही त्रास द्यायला सुरुवात केली, लहान शाळकरी मुले यांच्या अंगावर जावू लागली.

     या घटनेची दखल आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांनी सुद्धा घेतली आहे. याआधीही वानराने सुड घेण्यासाठी एका व्यक्तीचा पाठलाग केल्याची घटना घडली आहे. वनविभागाने त्या वानरला पकडुन जंगलात सोडल्यानंतर ही ते वानर २५ -३० किलोमिटर अंतर कापून त्याच गावात आले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा