Breaking

बुधवार, २९ डिसेंबर, २०२१

*धाडस व परिश्रमाच्या माध्यमातून यशस्वी उद्योजक होऊ शकतो : मा. लक्ष्मण कुंभार*

 

मा.लक्ष्मण कुंभार यांनी दिला यशस्वी होण्याचा मंत्र


*हिना मुल्ला : विशेष प्रतिनिधी*


रुकडी :  जिद्द,चिकाटी आणि आत्मविश्वास या बळावर आपण जीवनात यशस्वी होऊ शकतो, महाविद्यालयीन जीवनातील चार - पाच वर्षे प्रचंड मेहनत करा उरलेले आयुष्य सुखात जगू शकाल पण या चार-पाच वर्षात मेहनत केली नाही तर आयुष्यभर कष्ट करावे लागेल याची जाणीव तरुणांनी ठेवली पाहिजे. नोकरी करून आपण फक्त्त आपले कुटुंब चालवू शकतो.मात्र व्यवसाय कराल तर अनेक कुटुंबांना रोजगार देऊ शकाल, व्यवसायात थोडे धाडस व कष्ट घेण्याची मानसिकता ठेवली की व्यवसायात यशस्वी होता येते, असे मत शिरदवाडच्या कुंभार ऊस रोपवाटिकाचे मालक श्री. लक्ष्मण कुंभार यांनी व्यक्त्त केले ते येथील राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालयात बी.ए./बी.कॉम./ एम.ए. भाग एक या वर्गात नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभ व शिवाजी विद्यापीठ  मान्यतेने सुरू होत असलेल्या शिवण क्लास व अंगणवाडी कोर्सच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

       स्वागत व प्रास्ताविक कु. ऋतुजा जाधव हिने केले अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांतकुमार कांबळे होते. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डाॕ. प्रशांतकुमार कांबळे म्हणाले, संघर्षातूनच पुढे जायचे असते, संघर्षातून मिळालेले यश हे चिरकाल टिकणारे असते, आपण कोणाच्या संगतीत आहात त्यानुसार आपले विचार अवलंबून असतात त्यामुळे चांगल्याची संगत करा. या कार्यक्रमात कु. कोमल दरी श्री. महावीर सोगले यांनी मनोगत व्यक्त्त केले. आभार कु.सकिना नदाफ हिने मानले तर सूत्रसंचालन कु.स्टेफी कांबळे हिने केले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा