Breaking

बुधवार, २९ डिसेंबर, २०२१

*कागलच्या डी.आर.माने महाविद्यालयात इतिहास विषयाची एकदिवसीय कार्यशाळा यशस्वीपणे संपन्न*



सदर कार्यशाळेत मार्गदर्शन करताना डॉ. अरुण भोसले

*हिना मुल्ला :  विशेष प्रतिनिधी*


कागल : आज बुधवार दि.२९/१२/२०२१ रोजी महाविद्यालयाचा इतिहास विभाग आणि शिवाजी विद्यापीठ इतिहास परिषद कोल्हापूर सामंजस्य करार अंतर्गत 'Research Methodology for Research Guides' या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन प्रा. डॉ. अरुण भोसले यांच्या हस्ते झाले.

         या उद्घाटनप्रसंगी बोलताना डॉ. अरुण भोसले  म्हणाले की, संशोधक मार्गदर्शकांनी संशोधनाच्या बाबतीत काही कटू सत्य स्विकारले पाहिजे. त्याच बरोबर १८ व्या शतकातील मराठ्यांचा इतिहास उजेडात आणणे आवश्यक आहे. ते म्हणाले की, शिवाजी विद्यापीठाची स्थापना ही मुळात मराठ्यांचा इतिहासाचे संशोधन करण्यासाठी  झाली असून त्या दृष्टीकोनातून संशोधक मार्गदर्शकांनी पाहणे गरजेचे आहे. या उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष मा. प्राचार्य, डॉ. प्रवीण चौगले यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात आपल्याला आलेल्या संशोधन अनुभवाविषयी विस्तृत माहिती दिली.                                                  

      उद्घाटन समारंभा पूर्वी इतिहास विभागाच्या वतीने तयार केलेल्या 'कागल तालुक्यातील स्वातंत्र्य सैनिकांचा इतिहास' या भित्तीपत्रिकेचे उद्घाटन मा.प्रा.डॉ. अरुण भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी विभागातील विद्यार्थ्यांचे कौतुक केले.   यानंतर कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात डॉ.भारतभूषण माळी यांनी 'संशोधक मार्गदर्शकांची कार्य व कर्तव्य' विषयावर मार्गदर्शन केले. याविषयी मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, संशोधकांनी विचाराने आणि पुस्तकांनी समृद्ध असावे.  

    तर दुसऱ्या सत्रात डॉ.अवनिश पाटील प्रमुख,इतिहास अधिविभाग शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांनी 'Synopsis तयार कसा करावा' या विषयावर मार्गदर्शन केले.  तर तिसऱ्या सत्रात संशोधकांना येणाऱ्या अडचणी यावर समग्र चर्चा डॉ. कविता गगराणी व डॉ. निरंजन कुलकर्णी यांनी घडवून आणली. यामध्ये संशोधक मार्गदर्शकांनी  आपल्या समस्या संबंधितांना विचारल्या त्याची समाधानकारक उत्तरे संशोधक मार्गदर्शकांना  मिळाली.  यानंतर समारोप समारंभ करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण चौगले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते कार्यशाळेमध्ये सहभागी झालेल्या संशोधक मार्गदर्शकांना सर्टिफिकेटचे वितरण करण्यात आले.  या कार्यशाळेचे प्रास्ताविक डॉ.संतोष जेठिथोर इतिहास विभाग प्रमुख यांनी केले. तर आभार प्रा. कल्पना गुरव सदर प्रसंगी  प्रा.डॉ. सुरेश शिखरे सचिव, शिवाजी विद्यापीठ इतिहास परिषद, कोल्हापूर  प्रा. निशांत खाबडे, प्रा. डॉ. आदिनाथ गाडे. प्रा. आबासाहेब चौगले, प्रा. डॉ. सुशिलेंद्र मांजरडेकर. इतिहास विभागातील विद्यार्थ्यी व प्राध्यापक उपस्थित होते.

       सदर कार्यशाळेच्या माध्यमातून मिळालेल्या संशोधनात्मक शिदोरीने उपस्थित सर्व प्राध्यापक व विद्यार्थी यांनी समाधान व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा