ज्येष्ठ विचारवंत मा.एफ वाय कुंभोजकर सर मार्गदर्शन करताना |
*प्रा.डॉ. महावीर बुरसे : विशेष प्रतिनिधी*
जयसिंगपूर : जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूरच्या महाराष्ट्र विवेकवाहिनी या मंडळाचा उद्घाटन समारंभ उत्साहात संपन्न झाला.या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ विचारवंत मा.एफ. वाय.कुंभोजकर हे होते. अध्यक्षस्थानी कॉलेजच्या प्राचार्या डॉ. सौ.मनिषा काळे या होत्या. याप्रसंगी उपप्राचार्य प्रा. डॉ. एस.बी.बनसोडे होते.
कार्यक्रमाची सुरुवात रोपास जलार्पण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्याच्या मार्गदर्शनपर व्याख्यानात ते म्हणाले, आधुनिक काळात विवेकी विचार किती महत्वाचा आहे, की ज्यातून समाजाची जडणघडण चांगल्या प्रकारे होऊ शकते. यासाठी विवेकी विचार विद्यार्थ्यांच्या बालपणापासून रुजली पाहिजेत. देव हा दगडात नसून माणसात आहे याची जाणीव करून देणे हे शिक्षकाचे प्रमुख आद्य कर्तव्य असे त्यांनी विशद केले. तसेच आरोग्यपूर्ण समाजाच्या विकासासाठी समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता किती आवश्यक आहेत. तसेच विवेकी विचाराचा उगम व विकास याबाबत त्यांनी बहुमोल असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक महाराष्ट्र विवेक वाहिनीचे समन्वयक प्रा. संतोष डफळापुरकर यांनी विवेक वाहिनीचे उद्देश तसेच त्याचं महत्त्व आपल्या प्रास्ताविकामध्ये विशद केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य प्रो.डॉ.सौ. मनिषा काळे यांनी विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन किती महत्त्वाचा आहे हे सांगितले.
सदर कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांची ओळख श्री. बाळासाहेब पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे आभार श्री.संदीप परीट यांनी केले तर सूत्रसंचालन श्री.सुनिल चौगुले यांनी केले. याप्रसंगी प्रो.डॉ.नितीश सावंत, प्रो.डॉ.तुषार घाटगे, प्रा. सौ.सुनंदा शेळके,प्रा.डॉ. के.डी.खळदकर, प्रा. अमोल पवार, डॉ.महावीर बुरसे, प्रा. सुशांत पाटील, प्रा.शितल पाटील, सौ. अंजना चावरे तसेच कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील प्राध्यापक व विद्यार्थी व प्रशासकीय कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा