Breaking

गुरुवार, ३० डिसेंबर, २०२१

गोपाळ कृष्ण गोखले कॉलेज कोल्हापूर येथे जागतिक एड्स जनजागृती दिनानिमित्त व्याख्यान संपन्न !



     गोपाळ कृष्ण गोखले कॉलेज कोल्हापूर येथे आजादी का अमृत महोत्सव २०२१- अंतर्गत १ डिसेंबर २०२१ जागतिक एडस् अवरेनेस दीन निमित्त डॉ.  दीपक सावंत आणि राहुल सकट, एडस कौन्सेलर सीपीआर रुग्णालय यांचे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.


कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते- श्री. दिपक सावंत,एडस कौन्सेलर सीपीआर रुग्णालय होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. प्राचार्य डॉ. भुयेकर तर उपाध्यक्ष प्रा. अजित गाईंगडे होते.  प्रा. डी. के. नरळे यांची प्रमुख उपस्थिती होती.




*पावण जरा जपून, एडस् होतो लपून* असा संदेश देत, श्री दिपक सावंत आणि श्री राहुल सकट यांनी एडस् कसा होतो, त्याचे चार प्रकार, लक्षणे, उपाय यावर सखोल मार्गदर्शन केले.त्यांनी एडस् सतर्कता परिपत्रक ही वाटप केले.

जीवनाच्या प्रत्येक वळणावर व्यक्तीने सतर्कता पाळून स्वतः चे काळजी घ्यावी.

एड्स ची लग्न करताना, गर्भ धारणा झाल्यानंतर, आरोग्य सेवक यांनी काळजी टेस्ट करवून घेणे का गरजेचे आहे ते उदाहरण दाखले देऊन सांगीतले 



     *समाज प्रतिनिधि, उपस्थित मान्यवर , युवक युवती आप अपनी जिंदगी सही  मायनेमे खुशहाल जी सकते हो, सिर्फ सतर्कता अपने स्वास्थ प्रती बरतनी चाहिए!* या शब्दात प्रोग्रॅम अध्यक्ष डॉ. भूयेकर यांनी आपले मत व्यक्त केले.


      या कार्यक्रमासाठी शिक्षण प्रसारक मंडळ सर्व माननीय सदस्य, आदरणीय सेक्रेटरी *मा. प्रा. जयकुमार देसाई,*पेट्रोन कौन्सिल मेंबर *मा. दौलत देसाई* आणि ॲडमीनिस्ट्रेटिव ऑफिसर *डॉ. सौ. मंजिरी अजित मोरे* यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. 



कार्यक्रमासाठी प्राध्यापक -प्रा. डॉ. स्मिता एस. गिरी, प्रा. डी. एस. कांबळे तसेच एनएसएस आणि एनसीसी चे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रा. डी. एस. कांबळे YIN, डॉ. एम. के. पवार. NSS, प्रा. डी. के. नारळे. NCC इत्यादी समन्वयक होते.


     कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्तविक :- डॉ. राक्षसे यांनी केले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा