सुनील धनवडे या युवकाचे दातृत्व |
*चिदानंद अळोळी : नृसिंहवाडी प्रतिनिधी*
नृसिंहवाडी : श्री सुनील वसंतराव धनवडे मु. पो. नृसिंहवाडी या युवकांचे स्वतःचे पेढ्याचे दुकान आहे.सोबतच मंगलकार्य करण्यासाठी या युवकाने एक हॉल भाडेतत्वावर घेतलेले आहे . या युवकाने नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून सैनिकांच्या लग्न कार्यासाठी त्याच्या हॉल मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे.
भगवान दत्तात्रेयांची राजधानी श्री क्षेत्र नृसिंहवाडी संपूर्ण महाराष्ट्रासह, गोवा ,आंध्रप्रदेश व कर्नाटक या राज्यांमध्ये तीर्थक्षेत्र म्हणून खूप प्रसिद्ध आहे.अनेक भाविक, दत्तभक्त या तीर्थक्षेत्रात पुन्हा पुन्हा भेट देत असतात.
त्याच प्रमाणामध्ये नृसिंहवाडीतील पेढे,बासुंदी व दुग्धजन्य पदार्थ सर्वत्र प्रसिद्ध आहे.या गावांमध्ये यासाठी खूप मोठी बाजारपेठसुद्धा आहे.त्याच सोबत आपल्या विविध उपक्रमातून देशसेवा करणाऱ्या सैनिकांच्या सन्मान करण्यासाठी सुद्धा या गावाची आता ओळख होईल.
आपण पाहतो प्रत्येक भारतवासीयांच्या मनामध्ये देशाबद्दलचे प्रेम ,आदर मोठ्या प्रमाणावर असते , प्रत्येकांच्या परीने देश सेवा करण्याचा भाव त्यांच्यामध्ये तयार होत असतो. अनेक जण देश सेवेसाठी सीमेवर लढण्यासाठी सैन्यात भरती होतात. त्यासोबत आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या शौर्याने रात्रंदिवस देशाची रक्षा करतात.या सैनिकांचे आपण उपकार कधीच फेडू शकत नाही ,पण वेळोवेळी त्यांचा सन्मान करणे गरजेचे आहे कारण आपल्या स्वतःच्या कुटुंबाकडे लक्ष न देता संपूर्ण भारत देश हेच माझे कुटुंब असे म्हणणारे सैनिक असतात. याच सैनिकांसाठी नृसिंहवाडीतील युवकाने १ जानेवारी २०२२ पासून एक उपक्रम सुरु केलेला आहे.यामध्ये जे सैनिक सीमेवरती लढत असतात, सैन्यामध्ये असतात .त्यांच्या मंगल कार्यासाठी म्हणजेच लग्नसमारंभासाठी लागणारा हॉल मोफत देण्याचा निर्णय घेतलेला आहे.जेणेकरून या सैन्यांचे आभार आपल्या कृतीतून मांडता यावेत हीच माफक अपेक्षा असे प्रतिपादन या युवकाने केले.
या कृतीचे श्री क्षेत्र नृसिंहवाडीसह परिसरात व आसपासच्या गावात खूपच कौतुक होत आहे व सर्वसामान्य नागरिक व युवकांचा सैनिकांच्या बद्दलचे आदर वाढत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा