Breaking

बुधवार, ८ डिसेंबर, २०२१

राज्य स्तरावरील कायाकल्प अंतर्गत मूल्यमापन स्पर्धेत जयसिंगपूर प्रा.आरोग्य केंद्राने राज्यात पटकावला ११वा क्रमांक आणि कोल्हापूर जिल्ह्यात प्रथम स्थानी

 

जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉ. पांडुरंग खटावकर


मालोजीराव माने  : कार्यकारी संपादक


जयसिंगपूर : कायाकल्प अंतर्गत राज्य स्तरावरून सन २०२०-२०२१ साठी मूल्यमापन करण्यात आले होते राज्यश्री मूल्यमापन कमिटी मार्फत विविध विभागांची तपासणी व मूल्यमापन करण्यात आले होते. सदर मूल्यमापन मध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र या विभागासाठी झालेल्या मूल्यमापन स्पर्धे मध्ये जयसिंगपूर आरोग्य केंद्राचा राज्यात ११वा तर कोल्हापूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळाला.

    यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवेचा दर्जा, बाहेर रूग्णसेवा, आंतर रुग्णसेवा, प्रसूती,प्रसुतीपश्चात सेवा,लसीकरण ,कुटुंब नियोजन, सर्व राष्ट्रीय कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी,लोकसहभागातून दवाखान्यात केलेला कायापालट तसेच जनमानसात दवाखान्यात मिळणाऱ्या सेवेबाबत झालेली दवाखान्यात बाबतची उच्च प्रतिमा या निकषावर आधारित तपासणी करण्यात आली होती.


      या कालावधीत डॉ. पांडुरंग खटावकर यांनी जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार स्वीकारून केंद्रात केलेला कायापालट,रुग्णसेवा तसेच कोविड-१९ कालावधीत उत्कृष्ट नियोजन व सेवा यांचा गौरव झाला आहे. तसेच डॉ.खटावकर यांचे नियोजन व कार्यशैली पुन्हा एकदा राज्यस्तरावर अधोरेखित झाले आहे.

       यामध्ये प्रा.आ.केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. पांडुरंग खटावकर डॉ.मोघे तसेच सर्व आरोग्यसेविका, आरोग्य सेवक, औषध निर्माण अधिकारी ,आरोग्य सहाय्यक, लॅब टेक्निशियन, कनिष्ठ सहाय्यक, 108 डॉक्टर व पायलट, परिचर, ड्रायव्हर व आशा सेविका यांनी केलेल्या सांघिक कामाचा हा सन्मान आहे.

      यामध्ये राज्याचे आरोग्य राज्यमंत्री डॉ.राजेंद्र पाटील-यड्रावकर या विभागाच्या जिल्हा परिषद सदस्य सौ. स्वाती सासणे, पंचायत समिती सदस्य मन्सूर मुल्लाणी, जयसिंगपूर नगर परिषद चे मुख्याधिकारी टीना गवळी, नगराध्यक्षा डॉ.नीता माने, उपनगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, सर्व पदाधिकारी विविध सेवाभावी संस्था, स्वयंसेवी संस्था ,एनजीओ व विविध संघटना यांचे बहुमोल सहकार्य व मार्गदर्शन लाभले.


https://youtu.be/UvLdNXdk8_I


    याबाबत डॉ पांडुरंग खटावकर यांनी सर्व जनतेचे व सहकार्य करणाऱ्या सर्व घटकांचे मनापासून आभार मानले. यापुढे असच कार्य जोमाने करणार असल्याचं त्यांनी जय हिंद  न्यूज नेटवर्कशी बोलताना म्हणाले.

       जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळालेला या पुरस्काराने सर्व घटकातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा