Breaking

शुक्रवार, १० डिसेंबर, २०२१

निर्भीड पत्रकार रमेशकुमार मिठारे हे उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने सन्मानित

 

पत्रकार रमेश कुमार मिठारे यांना सन्मानित करताना


प्रा.अक्षय माने : कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी


कोल्हापूर :  युवा पत्रकार असोसिएशन महाराष्ट्र राज्य  यांच्या वतीने रमेशकुमार मिठारे यांना "आदर्श पत्रकारिता पुरस्कार २०२१" देऊन गौरविण्यात आला.

      रमेशकुमार मिठारे यांनी आपल्या पत्रकारीतेतुन पतसंस्था समोरील अडचणी  व पतसंस्थेतील कर्मचारी यांना सेवा नियम, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी लागू करणे बाबत जनजागृती केली व ते मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करत आहेत.याच बरोबर समाजातील अनेक दानशूर व्यक्तींच्या संपर्कातुन महापुर मदत असो अगर शैक्षणिक साहित्य असो त्यांनी निस्वार्थीपणे गरजवंताला मिळवून देत आहेत.तसेच मिडियाच्या माध्यमातून सैनिक टाकळी येथील तिन वर्षीय पृथ्वीराज कोळी या बालकाच्या डोळ्याचा कॅन्सर उपचार करिता मदत करत आहेत.याचे अवचित साधून युवा पत्रकार असोसिएशन महाराष्ट्र राज्य या संस्थेकडून पुरस्कार देण्यात आला.

  सदर पुरस्कार सोहळा शाहू स्मारक भवन कोल्हापूर येथे पार पडला या कार्यक्रमास प्रमुख पाहूणे कोल्हापूर चे महापौर सौ.निलोफर अजरेकर,माजी पोलीस अधीक्षक-आर आर पाटील, नामांकित विधी तज्ञ -ॲड.धनंजय पठाडे, उद्योगपती- एम.बी.शेख, रियाज बागवान,बशिर नदाफ,आदी मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिल सामंत यांनी केले तर आभार असोसिएशन चे अध्यक्ष- असलम नदाफ यांनी मानले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा