म्हाडा पेपर फुटी प्रकरणात अटक केलेल्या प्रीतिश देशमुखच्या घराची झाडाझडती घेतली असता टीईटीची ओळखपत्रे आणि हॉल तिकिटे सापडली होती. त्यामुळे टीईटी परीक्षेतही गैरप्रकार झाल्याचा संशय होता. त्यादृष्टीने सायबर पोलिसांनी तुकाराम सुपे यांना चौकशीसाठी बोलावले होते. या चौकशीनंतर सुपे यांना अटक करण्यात आली आहे.
या कारवाईनंतर खळबळ उडाली असून तपासाचे धागेदोरे अजून कुठपर्यंत जातात हे पहावे लागेल. प्रदीर्घ काळानंतर टीईटी परीक्षा झाल्याने अनेक परीक्षार्थींचे डोळे निकालाकडे लागले होते. मात्र, परीक्षा परिषदेच्या आयुक्तालाच अटक केल्याने निकाल लांबण्याची चिन्हे आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा