रविवार, १९ डिसेंबर, २०२१

*दिगंबरा दिगंबराच्या जयघोषात दुमदुमले श्री क्षेत्र नृसिंहवाडी; दत्त जयंती सोहळा उत्साहात*


श्री क्षेत्र नृसिंहवाडी ता.शिरोळ

प्रा.चिदानंद अळोळी :  नृसिंहवाडी प्रतिनिधी


नृसिंहवाडी  :  श्री दत्त प्रभूची राजधानी श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे शनिवार दि 18 /12/2021 रोजी उत्साहात श्री दत्त जन्मोत्सव उत्सव सायंकाळी 5 वाजता उत्साहात संपन्न झाला.

          भगवान श्री दत्तात्रेय याची राजधानी म्हणून संपूर्ण देशभरात ओळख असलेल्या वाडी क्षेत्रात संपूर्ण महाराष्ट्रासह , गोवा , आंध्रप्रदेश , कर्नाटक मधील  दत्त भक्त येत असतात.गेली अनेक महिने कोरोनाने सर्वच उत्सवास अनेक निर्बंध होते या मुळे या क्षेत्रात सर्व उत्सव कोरोनच्या नियमांना अधीन राहून मोजक्याच पुजारी च्या उपस्थितीत होत होते, पण आता या वर्षीच्या उत्सवास मात्र काही कोरोनाचे नियम पाळून साजरा करण्यास मा. जिल्हाधिकारी यांच्या कडून परवानगी मिळाली होती .या मुळे संपूर्ण दत्त भक्त व व्यापारी वर्गात उत्साह होता. 


    शनिवार दि . १८ डिसेंबर रोजी सायंकाळी ठीक ५.०० वाजता श्रींचे मुख्य मंदिरात श्री दत्त जन्मकाळ सोहळा संपन्न झाला . त्यानिमित्य श्री दत्त मंदिरात कार्यक्रमातील संपूर्ण दिवसभर कार्यक्रम झाले त्यात  

पहाटे ५ वा - काकड आरती व षोडोपचार पूजा  

सकाळी ७ ते १२- पंचामृत अभिषेक  

 दुपारी १२.३० -श्री च्या चरणकामलावर  महापूजा

दुपारी ४ ते ५ - वेदमूर्ती वामन शास्त्री उपाध्ये यांचे पुराण

रात्रौ ८ वा -धूप दीप आरती व पालखी सोहळा   अश्या पद्धतीने मुख्य कार्यक्रम झाल्यावर

श्रीं चा पाळणा दर्शनासाठी श्री विकास दिगंबर पुजारी व बंधू ( टेलिफोन ऑफिस ) नृसिंहवाडी येथे ठेवणेत आला व सर्व भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.

   अतिशय चांगल्या नेटक्या नियोजनासह दर्शन  रांगा बनवून संपूर्ण व्यवस्था करण्यात आली होती या साठी देववस्थान व्यवस्थापन , संपूर्ण कर्मचारी , ग्रामपंचायत , रेस्क्यू फोर्स , पोलीस प्रसाशन  याचे खुप मोठे सहकार्य लाभले .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा