इस्लामपूर शहराचे नामकरण ईश्वरपूर व्हावे या मागणीसाठी शहरातील शिवसेनेच्या मागणीवरुन तसा ठराव करण्यासाठी पालिकेची विशेष सभा शुक्रवार रोजी बोलावण्यात आली होती. मात्र या नामांतराच्या ठरावासाठी बोलविण्यात आलेल्या या सभेला विरोधी राष्ट्रवादीच्या सर्व व सत्ताधारी विकास आघाडीच्या ४ नगरसेवकांनी गैरहजेरी लावली. ३२ पैकी फक्त ९ सदस्य उपस्थित होते. त्यामुळे ही सभा रद्द करण्यात आली.
यापूर्वी सेनेने शहरात नामांतरासाठी स्वाक्षरी मोहीम राबविली होती. या स्वाक्षरीचे रेकार्ड घेवून जिल्हाप्रमुख आनंदराव पवार हे सभागृहात हजर झाले होते. तत्पुर्वी शिवसेना कार्यालयापासून शिवसैनिक भगवे फेटे नेसून, भगवे ध्वज हातात घेवून वाजत गाजत पालिकेत हजर राहिले होते. यावेळी पालिका आवारात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
देशात नामांतराचा सपाटा चालू असताना आता इस्लामपुरचे नाव बदलणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. मात्र याबद्दल नागरिकांत मतमतांतरे दिसून येत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा