कॉलेजमध्ये कॉम्पुटर लॅब उद्घाटन कार्यक्रमात मार्गदर्शन करताना |
*हिना मुल्ला : विशेष प्रतिनिधी*
रुकडी : रोटरी क्लब ही आंतरराष्ट्रीय पातळीवर सामाजिक क्षेत्रात काम करणारी महत्त्वाची संस्था आहे. रोटरीच्या वतीने नेहमीच विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा पुरविण्याचे काम केले आहे, त्याचाच एक भाग म्हणजे या महाविद्यालयास काॕम्प्युटर पुरविलेले आहेत. याचा उपयोग विद्यार्थ्यांना संगणक ज्ञान मिळविण्यासाठी होईल. असे मत पंजाब येथील रोटरीचे पदाधिकारी रो. बागसिंग पन्नू यांनी व्यक्त्त केले. ते येथील राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालयास इचलकरंजी येथील उद्योजक रो.यतिराज भंडारी यांनी त्यांचे बंधू दामोदर नारायणदास भंडारी यांच्या स्मृती प्रित्यर्थ तसेच रोटरी क्लब आॕफ गार्गीज कोल्हापूर यांच्या वतीने महाविद्यालयास प्रदान केलेल्या काॕम्प्युटर लॕब उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना होते.
स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य डाॕ. प्रशांत कांबळे यांनी केले. यावेळी रो.नरिंदर बरवाल, रो.मनजितसिंह भोवसीया, रो.वाय.आर. बक्षी, रो.यतिराज भंडारी, रो. राजू तारदाळे, रो. दिपीका कुंभोजकर, रो. अनघा पेंढारकर उपस्थित होते. आभार डाॕ. विजय देसाई यांनी मानले तर सूत्रसंचालन डाॕ. शंकर दळवी यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा