एमपीएससी (MPSC - maharashtra public service commission) महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनने आगामी वर्षातील म्हणजेच 2022 साल मधे होणाऱ्या संभाव्य परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. ( MPSC Timetable - 2022)
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2022 मध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. pic.twitter.com/TSNOZ64woC
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) December 4, 2021
गेल्या काही महिन्यांपासून एमपीएससी आयोग अत्यंत सक्रियपणे काम करत असल्याचे दिसत आहे. सरकारकडून आलेली मागणीपत्र जाहीर करणे, होणाऱ्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करणे, वेळच्या वेळी उत्तरपत्रिका प्रकाशित करणे , परीक्षार्थींच्या शंका दूर करणे ई. कामे आयोगाकडून स्पष्टपणे व वेळेवर केल्याचे दिसून येत आहे. यामुळे विद्यार्थी संतुष्ट असून भविष्यातही अश्याच पद्धतीने काम करण्याची अपेक्षा व्यक्त करत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा