Breaking

शुक्रवार, ३१ डिसेंबर, २०२१

*जयसिंगपूरच्या घोडावत कन्या कॉलेजमध्ये अर्थशास्त्र विभागाच्या वतीने भित्तीपत्रक उद्घाटन सोहळा संपन्न*


अर्थशास्त्र विभागाचा भित्तीपत्रक उद्घाटन समारंभ : डॉ. प्रभाकर माने


*प्रा. मेहबूब मुजावर : विशेष प्रतिनिधी*


      जयसिंगपूरच्या घोडावत कन्या कॉलेजमध्ये अर्थशास्त्र विभागाच्या वतीने भित्तीपत्रक उद्घाटन कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे प्रा.डॉ. प्रभाकर माने लाभले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.धनंजय कर्णिक व अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.भिलवडे होते.

      सुरुवातीस व्यावसायिक अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ.संदीप रावळ यांनी 'अर्थविश्व' या भितीपत्रक उद्घाटन प्रसंगी मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविकात बोलताना ते म्हणाले,  विदेशी व भारतीय अर्थशास्त्रज्ञांच्या व्यक्तिमत्वाचा जीवनपट विद्यार्थिनींना समजावा व आपल्या वैयक्तिक व सामाजिक जीवनात बदल करावा असा या आयोजनाचा हेतू आहे.

        यानंतर प्रमुख पाहुणे डॉ. प्रभाकर माने व प्राचार्य डॉ. कर्णिक यांच्या हस्ते भित्ती पत्रकाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी बोलताना डॉ.माने म्हणाले, उत्तम विषय-आशय ,सुंदर लेखन व कौशल्यपूर्ण सादरीकरणाच्या माध्यमातून विद्यार्थिनीनी भितीपत्रक बनविल्याबद्दल त्यांच्या या सुंदर कृतीबद्दल त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी डॉ. कर्णिक यांनी सुंदर लेखन केल्याबद्दल एका विद्यार्थिनीला रोख स्वरूपात रक्कम ही बक्षीस म्हणून दिली व विद्यार्थिनींच्या या निर्मितीबद्दल त्यांचे कौतुक उद्गार काढले.प्रा. भिलवडे यांनी याप्रसंगी आपले विद्यार्थ्याना प्रेरित करणारे विचार व्यक्त केले.

    या भितीपत्रक उद्घाटन कार्यक्रमाचा आभार डॉ.सौ शिंदे यांनी मानले. या कार्यक्रमास डॉ.ढाले ,डॉ. पंडित वाघमारे, डॉ. मिणचेकर,प्रा.रोहिणी पाटील व इतर प्राध्यापक बंधू उपस्थित होते. त्याचबरोबर अर्थशास्त्र विभागातील विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

       विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या या भित्तीपत्रक कलाकृतीचे सर्व घटकाकडून कौतुक केले जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा