लिंग समानतेवर मार्गदर्शन करताना मा.शशिकांत माने |
*सौंदर्या पोवार : विशेष प्रतिनिधी*
रूकडी : अनादिकालापासून पुरुष प्रधान संस्कृतीमुळे स्त्रियांना गौण स्थान प्राप्त झाले आहे. परंतु काळानुरूप भारतीय संविधान, लोकशाही बळकट करण्यासाठी व महिलांच्या सन्मानार्थ लिंग समानतेसाठी कार्य केले पाहिजे. मुळात भारतीय कायद्याने स्त्री-पुरुषांना समान हक्क दिले आहेत, परंतु अजूनही स्त्री-पुरुष असा भेदभाव मानला जातो काही कुटुंबात स्त्रियांना मारहाण होते. एखाद्या कुटुंबात मुलगा जन्मास आल्यावर जेवढा आनंद होतो तेवढा आनंद मुलगी जन्माला आल्यावर होत नाही, समाजाची ही मानसिकता बदलणे गरजेचे आहे मुलगा आणि मुलगी दोन्ही समानच आहेत याची जाणीव प्रत्येकामध्ये होणे आवश्यक आहे असे मत संपदा ग्रामीण महिला संस्था सांगलीचे श्री. शशिकांत माने यांनी व्यक्त्त केले ते येथील राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालयात जेंडर चॅम्पियन क्लब व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या वतीने आयोजित केलेल्या ' जबरदस्तीत कसली मर्दानगी ' ? अंतर्गत " लिंग समानता समजावून घेताना " या विषयावरील व्याख्यानात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांतकुमार कांबळे होते. स्वागत व प्रास्ताविक डॉ. गिरीश मोरे यांनी केले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. प्रशांतकुमार कांबळे म्हणाले विविध क्षेत्रांमध्ये आज स्त्रिया आपले कर्तृत्व सिद्ध करीत असताना पाहावयास मिळतात, तेव्हा पुरूषाने आपली मानसिकता बदलून स्त्रियांच्या मागे सक्षम पणे उभे राहून त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. आभार डॉ. शर्मिला साबळे यांनी मानले तर सूत्रसंचालन डॉ. अशोक पाटील यांनी केले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा