Breaking

बुधवार, ८ डिसेंबर, २०२१

धक्कादायक ! हेलिकॉप्टर दुर्घटनेत लष्कर दलाचे प्रमुख बिपिन रावत व त्यांच्या पत्नीसह अकरा सैनिकांचा मृत्यू

CDS बिपिन रावत



      देशाचे पहिले आणि सध्याचे तिन्ही लष्करी दलाचे प्रमुख (चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ) जनरल बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले. तामिळनाडू राज्यातील कोईम्बतूर आणि सुलूर दरम्यान कुन्नूर येथे हा अपघात झाला.


    सीडीएस जनरल बिपिन रावत आणि त्यांची पत्नी एका कार्यक्रमात सहभागी होऊन दिल्लीला परतत होते. त्यानंतर हवाई दलाचे Mi17-V5 हेलिकॉप्टर निलगिरीच्या जंगलात कोसळले. व त्यातच उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

     या अपघातात CDS बिपिन रावत व त्यांच्या पत्नी मालविका रावत यांच्यासह एकूण अकरा जणांचा मृत्यू झाला आहे.

       हेलिकॉप्टर अपघातात ग्रुप कॅप्टन वरुण सिंह हे एकमेव वाचले असून मृत्यूशी झुंज देत आहेत. त्यांना याच वर्षी 'शौर्य चक्र' मिळाले होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा