Breaking

रविवार, ३० जानेवारी, २०२२

*संतापजनक घटना ! कॉलेज युवतीवर बलात्कार करून तिचा केला खून*


प्रयागराज येथे युवतीवर बलात्कार आणि खून


उत्तर प्रदेश : मधील प्रयागराज मधील बी.ए.च्या विद्यार्थिंनीच्या खून प्रकरणी पैसे सत्य समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. पोलिसांनी असा दावा केला आहे की, बी.ए.च्या विद्यार्थिनीचा तिच्याच बॉयफ्रेंडनं खून केला असल्याचे उघड झाले आहे या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.

   सदर विद्यार्थिंनीच्या हत्येचं रहस्य उघड करताना पोलिसांनी सांगितले की, बॉयफ्रेंड आपल्या मृत गर्लफ्रेंडवर संशय घ्यायचा. त्यामुळे त्यानं तोंड आणि नाक दाबून तिची हत्या केली. हत्येपूर्वी आरोपी बॉयफ्रेंडनं तिच्यासोबत जे कृत्य केलं ते एकदम हैराण करणारं आहे.कर्नलगंजमध्ये बी.ए.च्या विद्यार्थिंनीच्या हत्या प्रकरणी पोलिसांनी मृत तरुणीचा बॉयफ्रेंड अमनसिंह राजपूतसह ३ आरोपींना अटक केली आहे. आरोपी अमन सिंह राजपूत आपल्या गर्लफ्रेंडवर संशय घ्यायचा त्यामुळे सदर संशय आरोपी बॉयफ्रेंड अमन सिंह राजपूत यानं आपल्या मित्रांसोबत गर्लफ्रेंडवर पहिलं बलात्कार केला आणि नंतर तिचं नाक आणि तोंड दाबून हत्या केली. तिची हत्या केल्यानंतर आरोपीनं गर्लफ्रेंडचा मृतदेह कचऱ्यात फेकून दिला. 

ही घटना २२ जानेवारीला घडली आहे. या दिवशी आरोपीनं आपल्या गर्लफ्रेंडला पुस्तक देण्याच्या बहाण्यानं IERT मैदानाजवळ बोलावलं होतं. त्याचवेळी आरोपी अमननं तिला ओरडण्यास सुरुवात केली. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर आरोपीनं गर्लफ्रेंडला जंगलात नेलं आणि या वादात त्यानं तिला मारहाण ही केली. त्या मारहाणीत तरुणी बेशुद्ध पडली. त्याच अवस्थेत तिच्यावर त्यानं बलात्कार केला.

      सध्या तिन्ही आरोपींना पोलिसांनी तुरुंगात पाठवलं आहे. पोलिसांनी म्हटलं की, ते दोघे गेल्या १० महिन्यांपासून एकमेकांना ओळखत होती. आरोपी आणि मृत तरुणी एकाच वर्गात शिकत होते.

    या घटनेने प्रयागराज परिसरात संतापजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा