औरंगाबादच्या या बोर्डाची देशभर चर्चा |
*करण व्हावळ : विशेष प्रतिनिधी*
काल पासून राज्यात एका बॅनरची चांगलीच चर्चा रंगली आहे. औरंगाबाद महापालिका निवडणूक लढवण्यासाठी बायको पाहिजे अशा आशयाचा एक बॅनर औरंगाबाद शहरात तीन ठिकाणी लावण्यात आला आहे. तसेच जातीची कुठलीही अट नाही असेही या बॅनरवर लिहिलं आहे रमेश विनायकराव पाटील यांनी हे बॅनर लावले आहे. मला तीन मुले असल्याने मी निवडणूक लढवण्यासाठी कायद्याच्या चौकटीत बसत नाही, त्यामुळे निवडणूक लढवण्यासाठी बायको पाहिजे त्यासाठी कुठल्याही जातीची अट नाही, कुठल्याही जातीची महिला चालेल वय वर्ष २५ ते ४० वयोगटातील अविवाहित विधवा किंवा घटस्फोटित महिला चालेल, पण त्यात एक अट ठेवण्यात आली आहे. या महिलांना दोनच अपत्य असले पाहिजे त्या पेक्षा जास्त असतील तर अशा महिलांना स्विकारला जाणार नाही. असे या बॅनरवर लिहिले आहे. राज्यात सर्वत्र याच बॅनरची चर्चा चालू आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा