Breaking

रविवार, २ जानेवारी, २०२२

*जयसिंगपूर कॉलेजमध्ये शिवाजी विद्यापीठाची आंतरविभागीय महिला खो-खो स्पर्धेचे आयोजन*

 

जयसिंगपूर कॉलेजमध्ये आंतर विभागीय महिला खो-खो स्पर्धेचे आयोजन


*जीवन आवळे  ; विशेष प्रतिनिधी*


 जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर येथे विद्यापीठीय पातळीवरील आंतर विभागीय महिला खो-खो स्पर्धा २०२१-२२ चे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धेचे उद्घाटक व प्रमुख पाहुणे म्हणून बोर्ड ऑफ स्पोर्ट्सचे चेअरमन प्रो डॉ बाबासाहेब उल्पे हे लाभणार आहेत.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  स्थानिक कमिटीचे सचिव डॉ.महावीर अक्कोळे  व  संस्थेचे सदस्य प्रा. आप्पासाहेब भगाटे,संस्थेचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित राहणार आहेत.

     शिवाजी विद्यापीठ संलग्नित सांगली,सातारा व कोल्हापूर या तीन जिल्ह्यांतून जवळपास १२ संघ  म्हणजे  १५० महिला खेळाडू, १५ प्रशिक्षक ,शिवाजी विद्यापीठाचे मॅनेजर, कोच व स्पर्धा निरीक्षक या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत. सदर स्पर्धा सोमवार दि.३ व मंगळवार दि.४ जानेवारी,२०२१ रोजी  आयोजित करण्यात आली आहे.

        शिवाजी विद्यापीठाच्या निवड समितीकडून खेळाडूंची निवड करण्यात येणार असून या मधून शिवाजी विद्यापीठाचा अंतिम संघ तयार होणार आहे.

     कॉलेजचे प्राचार्य डॉ.सौ.मनिषा काळे यांनी सदर स्पर्धेची पूर्ण तयारी झाल्याचे कळविले आहे. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक व संयोजक सचिव म्हणून संचालक, शारीरिक शिक्षण प्रा.डॉ.महादेव सूर्यवंशी काम पाहत आहेत.तरी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील सर्व संघ व महिला खो-खो खेळाडूंनी सदर स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा