Breaking

सोमवार, ३१ जानेवारी, २०२२

श्री अशोक कल्लया जंगम यांचा प्राणी मित्र पुरस्काराने सन्मान*

 

प्राणी मित्र अशोक जंगम यांचा यथोचित सन्मान


*प्रा. चिदानंद अळोळी : नृसिंहवाडी प्रतिनिधी*


रविवार  : दि.३१ जानेवारी रोजी कुरुंदवाड शहर श्रमिक पत्रकार संघामार्फत अशोक जंगम यांचा प्राणी मित्र पुरस्काराने  सन्मान व गौरव राज्याचे आरोग्य राज्यमंत्री नामदार श्री राजेंद्र पाटील-यड्रावकर साहेब यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान व सत्कार करण्यात आला.

    औरवाड गावातील श्री अशोक  जंगम व मोहन जंगम हे दोन्ही बंधू ,संपूर्ण महाराष्ट्र व कर्नाटक सीमाभागामध्ये बैलाच्या संगोपनात प्रसिद्ध आहेत.विशेष म्हणजे बैलांसाठी स्विमिंग टँकची संकल्पना त्यांनी प्रत्यक्षात अंमलात आणली व आपल्या दहा गुंठे मध्ये असलेल्या त्याच्या गोठ्यामध्ये स्विमिंग टॅंक उभारून त्यांची आंघोळीची व्यवस्था केली.

   स्वतःच्या पोटच्या मुलाप्रमाणे बैलाची काळजी घेत असतात. त्यांच्यासोबत गाय ,वासरू, म्हैस असे अन्य प्राणी सुद्धा त्यांच्या गोठ्यामध्ये आहेत. दोन्ही ही बंधू  पाळीव प्राण्यांच्यावर  जीवापाड प्रेम करतात.यामुळेच ते आपल्या औरवाडसह परीसरात  प्राणी सेवेस प्रसिद्ध आहेत.

      अशोक जंगम यांचा प्राणी मित्र पुरस्काराने सन्मानित होणे हे एका खऱ्या प्राणी मित्रांचा सन्मान असल्याची चर्चा परिसरात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा