Breaking

मंगळवार, १ फेब्रुवारी, २०२२

*जयसिंगपूरात बेकरीचे दुकान फोडीची घटना ; चोरट्याने रोख रकमेसह खाद्यपदार्थ केले लंपास*


जयसिंगपुरात बेकरीचे 2 दुकान फोडण्यात 


*जीवन आवळे : विशेष प्रतिनिधी*


     जयसिंगपूरातील राजस्थान स्वीट मार्ट व अरोमा बेकरीचे दरवाजे कटावणीच्या साह्याने तोडून रोकड रकमेसह खाद्यपदार्थ लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबतची फिर्याद जयसिंगपूर पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आली आहे.

       शहरातील नेहमी वर्दळ असलेल्या शिरोळ-वाडी रोडवरील १० व्या गल्लीतील  २ बेकरीचे दुकान फोडल्याची घटना समोर आली आहे. रोकड रकमेसह खाद्यपदार्थ चोरीस गेले आहेत. राजस्थान स्वीट मार्ट व अरोमा बेकरीचे दरवाजा फोडून चोरी करण्यात आली. रविवारी सकाळी चोरीची घटना निदर्शनास आली, दुकान शेजारी बसून चोरट्यांनी एकाच वेळी दोन्ही दुकानात चोरी केली आहे. दुकान बस स्थानकाच्या मागील बाजूस असून रात्री उशिरापर्यंत आणि पहाटे लवकर या ठिकाणी वर्दळ असते. मात्र चोरट्यांनी चाणाक्षपणे चोरी केली आहे. राजस्थान स्वीट मार्टचे मालक शिवाजी संनके आणि अरोमा बेकरीचे मालक रणेश तामेरी यांनी जयसिंगपूर पोलिसात फिर्याद दिली आहे. जयसिंगपूर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

       या  घटनेने संपूर्ण शहरात चिंताजनक वातावरण निर्माण झाला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा