Breaking

गुरुवार, १३ जानेवारी, २०२२

*औरवाड येथे ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी*


औरवाड येथे जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी


*प्रा. चिदानंद अळोळी : नृसिंहवाडी प्रतिनिधी*


औरवाड : दिनांक 12 जानेवारी 2022 या दिवशी राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंदन यांची जयंती असते .याचे औचित्य साधून ग्रामपंचायत मार्फत ग्रामपंचायतीच्या मिटींग हॉल मध्ये काही निवडक लोकांच्या उपस्थितीत जयंती साजरी करण्यात आली. यावेळी  या दोन्ही प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्याचा मान हा ग्रामपंचायतीचा कर्मचारी श्री जितेंद्र कांबळे व बाळासो शिंदे यांना देण्यात आला .तसेच सोबत रफिक कुडचिकर , बाळासो पांडव , पंचशीला कांबळे मॅडम सुद्धा होत्या.याप्रसंगी औरवाड चे विद्यमान सदस्य श्री जयवंत मंगसूळे यांनी आजच्या जयंतीचे विशेष महत्व  सांगितले. 

       पराक्रम आणि शौर्याचे धडे देऊन एक वीर, महापराक्रमी योद्धा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या स्वराज्यजननी, माँसाहेब जिजाऊ यांना जयंतीदिनी त्यांनी विनम्र अभिवादन केले.आणि अनुभव हा आपला सर्वोत्तम शिक्षक आहे. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत शिकत राहा" असे ही त्यांनी सांगितले .त्याचप्रमाणे थोर तत्त्वज्ञ व समाजप्रबोधक ,महापुरुष स्वामी विवेकानंद यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन केले.

       शिक्षणाचे महत्त्व पटवून देणारे स्वामीजींचे विचार आजही तितकेच प्रभावी आहेत. असेही त्यांनी सांगतीले. तसेच सर्वांना 'राष्ट्रीय युवक दिना'च्या शुभेच्छा दिल्या.  श्री किरण कांबळे यांनी आभार आणले.या कार्यक्रमाप्रसंगी औरवाड गावचे विद्यमान सदस्य श्री किरण कांबळे , श्री सनी मंगसुळे, वैभव जाधव, प्रा. चिदानंद अळोळी ,वैभव जाधव , विनायक घोरपडे, अतुल एरंडोले, सुरज परीट ई उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा