Breaking

रविवार, १६ जानेवारी, २०२२

*कर्नाटकच्या संकेश्वर शहरात भरदिवसा गोळीबार ; एका महिलेचा मृत्यू : आरोपीने केले पलायन*

 



बेळगाव :  कर्नाटकच्या संकेश्वर (ता. हुक्केरी) शहरात आज थरारक घटना घडली असून (रविवार) एका महिलेची अज्ञात इसमाकडून गोळ्या घालून  हत्या करण्यात आली. या घटनेने संकेश्वर शहर व आसपासचा परिसर हादरला आहे. पोलीस प्रशासन सतर्क होऊन मारेकऱ्यांचा तपास सुरु ठेवला आहे.

       शैला निरंजन सुभेदार वय वर्ष ५६ असे हत्‍या झालेल्‍या महिलेचे नाव आहे. हत्येच्या थरारक घटनेनंतर मारेकर्‍यांनी पलायन केले आहे. पलायन केलेल्या संशयित आरोपी शूटर्सच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांकडून शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत. बेळगाव जिल्ह्यातील एक शांत शहर म्हणून लौकिक असलेल्या संकेश्वर शहरात घडलेल्या गोळीबाराच्या घटनेने शांत शहर व अशांत झाले आहे. 

       सदर घटनेने एकच खळबळ माजली असून शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस अधिक सखोल तपास करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा