नोकरी मेळाव्यामध्ये सहभागी उमेदवार |
*प्रा. चिदानंद अळोळी : नृसिंहवाडी प्रतिनिधी*
शिरोळ : नृसिहंवाडी, औरवाड, गौरवाड, आलास,बुबनाळ, कवठेगुलंद, शेडशाळ व गणेशवाडी या सर्व गावांसाठी कृष्णा पंचगंगा सेवा फौंडेशन तर्फे मोफत 'मिशन नोकरी' अभियान रविवार दि 16/01/2022 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत , लालबहादूर हायस्कूल कवठेगुलंद च्या प्रांगणात कोविड चे नियम पाळून पार पडले.
या कार्यक्रमाची सुरुवात श्री किसान सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. श्री. बाळासाहेब शिवाप्पा शहापूरे याच्या पुतळ्यास कृष्णा पंचगंगा सेवा फौंडेशनचे अध्यक्ष श्री प्रसाद दुग्गे याच्या हस्ते हार अर्पण करून अभिवादन ही करण्यात आले. त्यानंतर लगेचच सर्व नोकरीसाठी इच्छुक उमेदवाराची मुलाखत घेण्यात आली . या मध्ये एकूण 80 उमेदवारांनी मुलाखती दिल्या. या मध्ये 10वी, 12वी, पदवीधर, उच्च पदवीधर युवक युवती याचा समावेश होता . त्यांच्या आवडत्या क्षेत्रामध्ये व त्यांना इच्छित शहरात नोकरी मिळवून देण्याचे प्रयत्न या नोकरी मिशनच्या अभियानामुळे होणार आहे.ग्रामीणभागातील सुशिक्षित, बेरोजगार , नोकरीतला अनुभवी असणाऱ्या 80 तरुण तरूणी आज याचा लाभ घेतला .
फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री प्रसाद दुग्गे यांनी युवकांना बोलताना त्यांनी आवाहन केले की ग्रामीण भागातल्या मुलांसाठी आमच्या संस्थेमार्फत मिशन नोकरीचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व सुशिक्षित बेरोजगार यांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा