जेनापुरात पत्रकार दिन उत्साहात साजरा |
*प्रा. मेहबूब मुजावर : जैनापूर प्रतिनिधी*
जैनापूर : ६ जानेवारी अर्थात आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती होय. हाच दिवस सर्वत्र पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. जैनापुरकरांनी या दिनाचे औचित्य साधून जैनापूर येथे मान्यवर पत्रकार बंधूंचे यथोचित सन्मान करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या प्रसंगी दानोळी परिसर पत्रकार संघाचे उपाध्यक्ष मा.रमेश चव्हाण व गावातील एकमेव पत्रकार प्रा.मेहबूब मुजावर यांचा गावच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच संगीता कांबळे,उप सरपंच आनंदराव बिरंजे,ग्रा.पं. सदस्य झाकीर मुजावर, विद्याधर पाटील,शुभांगी बिरंजे,भाग्यश्री सुतार,ग्रामसेवक रावसाहेब कोळी,पोलीस पाटील आदीकुमार पाटील,सामाजिक कार्यकर्ते पोपट पाटील,सुरेश हजारे,लालासो रण नवरे, अक्षय कोळी,अजित पाटील,पिंटू पाटील व अल अमीन तरुण मंडळाचे कार्यकर्ते आदी उपस्थित होते..
मान्यवरांनी आपल्या मनोगतात सत्कार मूर्तींच्या मेहनत व कार्याचे कौतुक केले,तसेच वर्षभरात ग्राम पंचायतीने केलेल्या विविध विधायक कार्याचे देखील यावेळी सर्वांकडून कौतुक करण्यात आले..हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील तरुण कार्यकर्त्यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.
जैनापूरकरानी पत्रकारांच्या विषयी दाखविलेला आदर-सन्मान कार्यक्रम कौतुकास्पद होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा