Breaking

सोमवार, १० जानेवारी, २०२२

दानोळी नदीपात्रात सापडली तब्बल 14 फुटांची मृत मगर

 

नदी पात्रात मृतावस्थेत आढळली मगर

मालोजीराव माने - कार्यकारी संपादक

दि. 10 जानेवारी,2022

     आज सकाळी तांबोळी वत, दानोळी येथे ग्रामस्थांना नदीपात्रात मृत मगर दिसून आली. वनविभागाला माहिती मिळताच वनविभागाने मगरीला पाण्यातून बाहेर काढून वैद्यकीय चाचणी करून दफन केले.


     मगर पाण्यातून बाहेर काढल्यानंतर त्याचे मोजमाप घेतले असता , त्याची लांबी 14 फूट तर वजन अंदाजे 500 ते 600 किलो होते. पशू वैद्यकाच्या मते मगर वयस्कर झाल्यामुळे मृत झाल्याचे सांगितले जात आहे. मगरीच्या कुजत चाललेल्या शरीरावरून मगरीचा मृत्यू 2 ते 3 दिवस आधी झाल्याचा अंदाज आहे.




     वनक्षेत्रपाल रमेश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल आर. देसा, वनरक्षक एस. शिरोळकर, मोहन देसाई, म. नवाळी, व वन कर्मचारी हरी , लहू भंडारी, भगवान भंडारी यांनी ही जबाबदारी पार पाडली.

     मगर पाण्यातून बाहेर काढून दफन करेपर्यंत अँनिमल सहारा फाउंडेशन, जयसिंगपूर चे अक्षय मगदूम , हणमंत न्हावी, विजय पाटील, सागर पाटील, मालोजीराव माने इत्यादींचे मोलाचे सहकार्य लाभले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा