एनएसएसच्या वतीने सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी |
*विद्या दळवी : विशेष प्रतिनिधी*
जयसिंगपूर महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजनाद्वारे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.एक स्त्री शिकली म्हणून कुटुंब सुधारले, कुटुंब सुधारले म्हणून समाज सुधारेल,समाज सुधारले म्हणून जग सुधारेल....हा विचार घेऊन राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने 3 जानेवारी 2022 रोजी क्रांतिज्योत सावित्रीबाई फुले यांच्या जयंती व मा. प्राचार्या सौ. प्रो. डॉ मनीषा काळे यांच्या विशेष सत्कार करण्यात आला.
कु. विद्या दिलीप दळवी महात्मा ज्योतिबा फुले वेशभूषा आणि नेहा यशवंत राठोड यांना क्रांतीजोत सावित्रीबाई फुले यांनी वेशभूषा परिधान केला होता. यानंतर सर्व मान्यवर आणि म. जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांची हलगी वादनात रॅली आयोजन केले व ही रॅली वॉचमन गेट पासून महाविद्यालयाच्या प्रांगणात कवीकट्टा या ठिकाणापर्यंत काढण्यात आली.त्यानंतर कार्यक्रमास सुरवात झाली. या वेळी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे प्र.प्राचार्या सौ. प्रो. डॉ. मनीषा काळे, अध्यक्षस्थानी प्रा.डॉ. नितिश सावंत (मराठी विभागप्रमुख) उपस्थित होते.
सावित्रीबाई फुले आणि जोतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. एक दिवसासाठी दोन मुलींना वेशभूषा देण्यात आले होते त्यांनी एकपात्री नाटक सादरीकरण केले. यावेळी जोतिबा फुले म्हणाले की...शिका, संघर्ष करा व संघटित व्हा हा हेतू त्यांच्या मनोगतीतून आले.
सावित्रीबाई फुले म्हणाले की....कोवीडच्या काळात लॉकडाऊन असतानासुद्धा सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींची शिक्षण व्यवस्था ऑनलाइन सुरु होती त्या सर्व शिक्षकांचे आभार मानले पाहिजे. कारण कोणत्याही मुला-मुलींना नुकसान झाले नाही हा हेतू त्यांच्या विचारातून आले. प्रमुख पाहुणे मनोगतमध्ये प्राचार्या सौ. प्रो. डॉ. मनीषा काळे यांनी स्त्री शिक्षणाचं महत्त्व आणि स्त्री शिकली तर समाज सुधारेल हे विचार त्यांच्या मनोगतातून आले.
शेवटी अध्यक्षीय मनोगत प्रा. डॉ. नितिश सावंत यांनी रयत शिलेदार, आणि आधारवड हे दोन्ही पुस्तके वाचा आणि त्या थोर विचारवंतानी जे शिक्षण व्यवस्था सुरु केले त्यावेळी त्यांना जे आलेले संकट तशी आपल्या शिक्षणाने तर काहीच नाही ..या कार्यक्रमाचे शेवटी आभार प्रदर्शन वेळी एनएसएस प्रतिनिधी विक्रांत माळी यांनी उपस्थित सर्व मान्यवर मान्यवर, सर्व प्राध्यापक वर्ग वादन वाले, स्वयंसेवक व स्वयंसेविका यांचे आभार मानले.
या कार्यक्रमात उपस्थित असणारे प्राचार्या सौ. प्रो. डॉ. मनीषा काळे, प्रा. डॉ. नितिश सावंत (मराठी विभागप्रमुख), प्रा. डॉ सुनील बनसोडे ( उपप्राचार्य) प्रा. आर. डी. तासगावकर, प्रा. डॉ. बी. एम. सरगर,डॉ. गुरुनाथ निकम ,मा.संजय मगदूम ( कार्यालयीन अधीक्षक) राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी) प्रा. डॉ. प्रभाकर माने, प्रा. डॉ. के.डी.खळदकर, पालक मा. श्री. गुरुदेव माळी ( उद्योगपती) एनएसएस प्रतिनिधी विक्रांत माळी तसेच स्वयंसेवक स्वयंसेविका उपस्थित होते.
या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा