Breaking

शनिवार, २९ जानेवारी, २०२२

*सांगलीची संग्राम संस्था व राष्ट्रीय सेवा योजना यांचेवतीने शिरोळ तालुक्यात 'जबरदस्तीत कसली मर्दानगी'चे दर्शन घडविणारे पोस्टर्स*

 

मा. प्राचार्य डॉ.सौ.मनीषा काळे यांच्या हस्ते पोस्टरचे उद्घाटन


*प्रा.डॉ. महावीर बुरसे :  विशेष प्रतिनिधी*


जयसिंगपूर : सांगलीची संग्राम संस्था व राष्ट्रीय सेवा योजना यांचेवतीने 'जबरदस्तीत कसली मर्दानगी' या महिलांचा सन्मान व आत्मअभिमानाचे दर्शन घडविणारे पोस्टर्स शिरोळ तालुक्यातील विविध गावामध्ये व जयसिंगपूर शहर - परिसरात लावण्यात आले आहेत.

        सांगलीची लोकप्रिय व सेवाभावी वृत्तीने कार्यरत असणारी संग्राम नावाची एन जी ओ(NGO) विविध विषय व उपक्रमांतर्गत अतुलनीय मानवीय सेवा करीत आहे. संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष मीना सेशु यांच्या उत्तम नेतृत्वाखाली विविध सामाजिक विषयांना स्पर्श करणारे उपक्रम सातत्याने राबवले जात असतात. त्याच उपक्रमांपैकी "जबरदस्ती कसली मर्दानगी" या थीम खाली शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून दिनांक ३ जानेवारी,२०२२ ते १२ जानेवारी,२०२२ या काळात पोस्टर लावण्यात आले आहेत. हे पोस्टर्स लावण्याचे हेतू लोकांच्या मध्ये स्त्रीप्रधान मानसिकतेला बळ देणे,स्त्री पुरुष समानता प्रस्थापित करणे व राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सामाजिक संवेदनशीलता निर्माण करणे हे आहेत.

      जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून जवळपास २५ खेड्यांमध्ये जबरदस्तीत कसली मर्दानगी  हे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. या माध्यमातून विद्यार्थ्यांनी सामाजिक जनजागृती व प्रबोधन करण्याचे कार्य केले आहे.

       या उपक्रमास जयसिंगपूर कॉलेजचे प्राचार्य डॉ.सौ.मनिषा काळे यांच्या हस्ते सदर पोस्टरचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर NSS स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी सदर पोस्टर्स उत्स्फूर्तपणे विविध गावां मधील सार्वजनिक ठिकाणी चिटकवली आहेत.


       या उपक्रमात संग्रामचे सदाशिव माने,सौ.कविता सपकाळ हे पदाधिकारी त्याचबरोबर कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रभाकर माने , डॉ. के.डी. खळदकर, एनएसएस प्रतिनिधी विक्रांत माळी, नेहा राठोड, गौरव पाटील, विवेक कांबळे व अन्य स्वयंसेवकांचे सहकार्य लाभले.


      सामाजिक संवेदनशीलता निर्माण करणाऱ्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

1 टिप्पणी: